आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीना अंबानींनी दिली श्रीदेवींच्या पतीला खास भेटवस्तू, बोनी यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 24 फेब्रुवारी 2018 रोजी बाथटबमध्ये बुडाल्याने अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले होते. श्रीदेवी यांच्या निधनाच्या तेराव्या दिवशी श्रीदेवी यांची क्लोज फ्रेंड टीना अंबानी यांनी बोनी कपूर यांना एक खास भेटवस्तू दिली. रिपोर्ट्सनुसार, ही भेटवस्तू बघून बोनी कपूर फक्त भावूकच झाले नाहीत, तर त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. 


दिली ही खास भेटवस्तू... 
- टीना अंबानी यांनी श्रीदेवी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या छायाचित्रांची एक सिल्व्हर फ्रेम बनवून ती बोनी कपूर यांना भेट म्हणून दिली.
- या फ्रेममधील बोनी आणि श्रीदेवी यांचे काही निवडक फोटोज हे टीना यांच्या 61 व्या वाढदिवशी क्लिक करण्यात आले होते. हे फोटोज श्रीदेवी यांचे शेवटचे फोटोज ठरतील, याचा कधी कुणी स्वप्नातदेखील विचार केला नसेल.
- या भेटवस्तूचा स्वीकार करुन बोनी कपूर यांनी टीना यांना धन्यवाद दिले.
- टीना आणि श्रीदेवी दीर्घ काळापासून एकमेकांच्या संपर्कात होत्या. पार्टीजमध्ये दोघी नेहमी सोबत दिसायच्या.
- टीना अंबानी यांचा 61 वा वाढदिवस श्रीदेवी यांच्या निधनाच्या (24 फेब्रुवारी) 13 दिवसांपूर्वी म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी होता.


पुढील स्लाईड्सवर बघा, टीना अंबानींच्या 61 व्या वाढदिवसाचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...