आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणी 600 तर कुणी केले 150 चित्रपटांमध्ये काम, या आहेत साऊथचा 10 खलनायिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/बंगळूरूः चित्रपटांमध्ये जेवढे महत्त्व हीरो-हिरोईनला असते, तितकेच किंबहुना कधीकधी त्यांच्यापेक्षा अधिक महत्त्व हे व्हिलनला दिलं जातं. चित्रपटांमधील खलनायक भूमिका देखील खूप पसंत केल्या जातात. मग तो 'मिस्टर इंडिया'मधील मोगॅम्बो असो वा 'कर्मा'मधील डॉक्टर डँग... निगेटिव्ह भूमिकांविषयी सांगायचे झाल्यास, ललिता पवार आणि बिंदू या अभिनेत्रींनीदेखील आपल्या ग्रे शेडच्या भूमिकांमधून इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोघींनी सुमारे पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सर्वाधिक व्हिलनची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे एमएन लक्ष्मीदेवी. या कन्नड अभिनेत्रीने तब्बल 600 चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी त्यांच्या सर्वाधिक भूमिका या निगेटिव्ह होत्या. 


कोण आहेत एमएन लक्ष्मीदेवी...
- कर्नाटकच्या मांड्या येथील रहिवाशी असलेल्या एमएन लक्ष्मीदेवी यांनी तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीत काम केले आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये सर्वाधिक खलनायिका साकारली आहे. त्यांनी 1952 मध्ये 'श्रीनिवास कल्याणम्'द्वारे डेब्यू केले होते. याशिवाय त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये भक्त कनकदास (1960), वीर केसरी (1963), बांगरदा मनुष्य (1972), कल्याणोत्सव (1995) या चित्रपटांचा समावेश आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, साऊथच्या 10 लोकप्रिय लेडी Villains विषयी... 

बातम्या आणखी आहेत...