आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TV Actress Dipika Kakar Makes Her Bollywood Debut In JP Duttas Paltan \'सिमर\'की तो निकल पडी... लग्न ठरले लकी, या फिल्ममधून करते बॉलिवूडमध्ये Debut

\'सिमर\'की तो निकल पडी... लग्न ठरले लकी, या फिल्ममधून करते बॉलिवूडमध्ये Debut

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'ससुराल सिमर का' या मालिकेतील सिमरच्या भूमिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री दीपिका कक्कड सध्या सातवे आसमानपर आहे. अलीकडेच दीपिका तिचा बॉयफ्रेंड शोएब इब्राहिमसोबत लग्नगाठीत अडकली. लग्नानंतर आता ती बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. जेपी दत्ता यांच्या आगामी पलटन या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. याशिवाय ती पहिल्यांदाच एकता कपूरच्या 'कयामत की रात' या मालिकेतही झळकणार आहे. 


दीपिकाशी याचविषयावर झालेली ही खास बातचीत..  

 

जेपी दत्तांच्या 'पलटन'मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेस? याविषयी काय सांगणार ? 
- मी या चित्रपटात सामान्य हरियाणवी मुलीच्या भूमिकेत दिसेल. यात माझ्यासोबत अपोझिट गुरमीत चौधरी आहे. गुरमीत फौजी आहे. युद्धावर जाण्याआधी त्याच्यासोबत माझा साखरपुडा होतो. जेपी सरांसोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. ते कधीच वाचायला स्क्रिप्ट देत नाहीत. सेटवर गेल्यानंतरच कळते की स्क्रिप्टमध्ये काय आहे. कलाकाराचा अभिनय खरा वाटावा, असे त्यांचे म्हणणे असते. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वत:ला लकी समजते. टीव्ही आणि चित्रपटात काम करणे खूप अंतर आहे. टीव्हीवर सतत १२ तास काम करावे लागते. एपिसोड पूर्ण करण्याचे प्रेशर राहते. मात्र, चित्रपटाचे शूटिंग आरामाने होत असते. 

 

पुढे वाचा, दीपिकाच्या करिअर आणि पर्सनल लाइफविषयी आणखी बरंच काही... 

 

बातम्या आणखी आहेत...