आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून मासिक पाळीच्या दिवसांत सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाही दीया मिर्झा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची 'पर्यावरण दूत' असलेली अभिनेत्री दीया मिर्झा पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेताना दिसते. वैयक्तिक आयुष्यातही 'इको-फ्रेण्डली' गोष्टी मोठ्या प्रमाणात वापरण्याकडे दीयाचा कल असतो. पर्यावरणाच्या प्रेमापोटी तिने पर्यावरणाला घातक ठरणारे सॅनिटरी नॅपकिन वापरणे चक्क बंद केलं आहे.

 

काय म्हणाली दीया मिर्झा?
दीया मिर्झाने पर्यावरणाबाबत नेहमी आग्रही भूमिका घेतली आहे. पर्यावरण संवर्धनाविषयी अलीकडेच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दीया म्हणाली, ''ज्या वस्तू पर्यावरणाला धोका पोहोचवतात, त्या वस्तू वापरणे मी केव्हाच बंद केले आहे. अगदी सॅनिटरी नॅपकिनसुद्धा. सॅनिटरी नॅपकिन पर्यावरणाला प्रचंड प्रमाणात प्रदूषित करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या सॅनिटरी नॅपकिनचा वापर मी बंद केला आहे. तसेच, मी इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन वापरते. पूर्वी महिला ज्या पद्धतीने मासिक पाळीदरम्यान सुती कापडाचा वापर करायच्या, तशा पद्धतीच्या 100 टक्के विघटन होणाऱ्या नॅपकिनचा मी वापर करते.'' 


पुढे वाचा,  सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात करत नाही दीया.. 

बातम्या आणखी आहेत...