आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापुरमध्ये शिक्षण घेते अजय देवगणची मुलगी, अभिनयात नाही Interest

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा सध्या आपल्या स्टनिंग लूकमध्ये चर्चेत आहे. ती नुकतीच कालोजसोबत सिंगापुरमधील मादाम तुसाँ म्यूझिअममध्ये गेली होती. येथे आई-लेकीने एकत्र पोज दिल्या. विशेष म्हणजे यावेळी न्यासा ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खुप स्टायलिश दिसत होती. खुप कमी लोकांना माहिती असेल   की, न्यासा सिंगापुरमध्ये शिक्षण घेतेय. याच कारणामुळे ती आपल्या आई-वडीलांपासून दूर राहतेय. 


14 वर्षांच्या मुलीला खुप समजदार समजतो अजय
- अजय देवगण आणि काजोलला मुलगा युग आणि मुलगी न्यासा असे दोन मुलं आहेत. न्यासा थोरली आहे.
- 20 एप्रिल 2003 मध्ये न्यासाचा जन्म झाला. ती 14 वर्षांची झाली आहे. ती सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते.
- न्यासा आपल्या वडिलांच्या खुप जवळ आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, न्यासा खुप समजदार आहे. ती खुप जास्त विचार करते आणि प्रत्येक गोष्ट एनालाइज करते.
- मुलाखतीत अजय म्हणाला होता की, त्यांचे मुलं त्याच्यासाठी स्ट्रेसबस्टर आहेत.
- आई काजोलसोबत न्यासाची बॉन्डिंग चांगली आहे. काही काळापुर्वी काजोलने इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला होता यामध्ये ती खुप हैरान दिसत होती.
- काजोलने हा फोटो न्यासाला टॅग केला होता. यावर काजोलने कॅप्शन दिले होते की, "जेव्हा मी माझ्या मुलांना एकत्र पाहते." यावर न्यासाने उत्तर दिले होते की, "मॉम, तु एवढे Extra का करते?"

 

मोठे होऊन न्यासाला हे बनायचे 
- न्यासानुसार तिला चित्रपटात अभिनय करायचा नाही. तिला जगप्रसिध्द शेफ बनायचे आहे.
- न्यासाची आई काजोलनेही सांगितले आहे की, तिच्या मुलीला कुकिंग खुप आवडते.
- काजेलने काही काळापुर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, न्यासा सध्या बेकिंग शिकतेय. तिला बेकिंग करणे आवडते.
- न्यासा अभ्यासतही हुशार आणि एक चांगलि स्विमरही आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा न्यासाचे कुटूंब आणि फ्रेड्ससोबतचे काही Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...