आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unknown Facts About Sanjay Dutt Elder Sister Namarata Dutt \'संजू\'ची बहीण प्रिया दत्तला ओळखता, पण या बहिणीविषयी तुम्हाला काही ठाऊक आहे का!

\'संजू\'ची बहीण प्रिया दत्तला ओळखता, पण या बहिणीविषयी तुम्हाला काही ठाऊक आहे का!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला 'संजू' हा चित्रपट या महिन्यात 29 जूनला रिलीज होतोय. या चित्रपटात संजयच्या खासगी आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला असून त्याच्या कुटुंबीयांचा अर्थातच आईवडील, बहिणी, पत्नी आणि मित्रमंडळींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये परेश रावल यांनी संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांची भूमिका वठवली असून आई नर्गिस दत्तच्या भूमिकेत मनिषा कोइराला आहे. चित्रपटात संजयची धाकटी बहीण प्रिया दत्त हिचादेखील उल्लेख आहे. प्रियासोबतच संजयला आणखी एक बहीण आहे, पण तिच्याविषयीचा उल्लेख चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसला नाही. 


कोण आहे संजयची ही थोरली बहीण...
सुनील दत्त आणि नर्गिस यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या थोरल्या मुलीचे नाव नम्रता दत्त आहे. नम्रतानंतर संजयचा जन्म झाला. तर प्रिया दत्त या दोघांची धाकटी बहीण आहे. संजय अभिनेता आहे, तर प्रिया राजकारणात सक्रीय आहे. त्यामुळे या दोघांविषयी सामान्यांना बरंच काही ठाऊक आहे. पण संजयची थोरली बहीण नम्रता अभिनय किंवा राजकारणात दिसत नाही. कॅमे-यामागे आयुष्य जगत असल्याने तिच्याविषयी सर्वसामान्यांना फारसे काही ठाऊक नाही. 


दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांची सून आहे नम्रता दत्त 
नम्रता दत्त हिचे लग्न दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांचा मुलगा आणि अभिनेता कुमार गौरवसोबत झाले आहे. 9 डिसेंबर 1984 रोजी कुमार गौरवसोबत नम्रता विवाहबद्ध झाली होती. या दाम्पत्याला साची आणि सिया या दोन मुली आहेत. थोरली लेक साचीचे लग्न कमाल अमरोही यांचा नातू बिलाल अमरोहीसोबत झाले आहे. कमाल अमरोही यांना 'पाकिजा' या चित्रपटासाठी ओळखले जाते. 


संजय दत्तच्या लग्नात सहभागी झाली नव्हती नम्रता दत्त
संजय दत्तचे तिसरे लग्न मान्यता दत्तसोबत झाले आहे. नम्रता दत्त हिला मान्यता पसंत नसल्याने तिला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे जेव्हा संजय दत्तने मान्यतासोबत लग्नाचा निर्णय घेतला होता, तेव्हा या बहीणभावंडांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. एकाच बिल्डिंगमध्ये राहूनदेखील नम्रता या लग्नात सहभागी झाली नव्हती. 


संजय तुरुंगात गेल्यानंतर प्रिया आणि नम्रता यांनी घेतली होती मान्यता आणि मुलांची काळजी...
संजय दत्तला तुरुंगवास झाल्यानंतर त्याच्या गैरहजेरीत प्रिया आणि नम्रता यांनी मान्यता आणि त्यांच्या जुळ्या मुलांची काळजी घेतली होती. याकाळात नम्रता आणि संजय यांच्यातील दुरावा मिटला. आता ही बहीणभावंड पुन्हा एकदा गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.  


पुढील स्लाईड्सवर बघा, नम्रता दत्त हिची कुटुंबीयांसोबतची निवडक छायाचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...