Home »Gossip» Unseen And Inside Photos Of Bollywood Actor Akshay Kumar House

या आलिशान घरात वास्तव्याला आहे 'पॅडमॅन', तुम्ही पाहिलेत का घराचे Inside Pics

दिव्य मराठी वेब टीम | Feb 09, 2018, 12:04 PM IST

अभिनेता अक्षय कुमार स्टारर पॅडमॅन हा चित्रपट आज (09 फेब्रुवारी) बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसह राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. भारतात तब्बल 2750 स्क्रिनवर तर ओव्हरसीजमध्ये 600 स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकला आहे. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद चित्रपटाला मिळतोय.
चित्रपटांमध्ये दमदार भूमिका वठवणारा अक्षय त्याच्या लॅव्हिश लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो.


या आलिशान डुप्लेक्सचा मालक आहे अक्षय...

अक्षय पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी नितारासोबत अंधेरी वेस्टच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्याला आहे. त्याचे हे आलिशान डुप्लेक्स जुहू बीच समोर आहे. घराचे इंटेरिअर त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने केले आहे. ग्राउंड फ्लोअरवर लिव्हिंग एरिया, डाइनिंग एरिया, किचन, होम थिएटर आणि अक्षय कुमारचे क्लोजेट आहे. तर पहिल्या फ्लोअरवर बेडरुम, पँट्री, ट्विंकल खन्नाचे ऑफिस आणि बालकनी आहे. या बालकनीत अक्षय त्याच्या फॅमिलीसोबत लूडो आणि इतर इंडोर गेम्स खेळत असतो. त्याच्या घराबाहेर एक सुंदर गार्डन आहे. ट्विंकलला गार्डनिंगचा आवड आहे. तिने तिच्या गार्डनमध्ये अनेक प्रकारची फुलझाडे लावली आहेत.


डायनिंग रुममधून दिसते गार्डन...
अक्षयच्या घरातील डायनिंग एरियातून गार्डन दिसते. डायनिंग एरियाला एक मोठी ग्लास वॉल आहे. लिव्हिंग एरियामध्ये मोठे सोफे ठेवलेले आहेत. रुमच्या सेंटरमध्ये एक पॉण्ड आहे, ज्यात कमळाची फुले दिसतात. वॉलवर मोठे पेंटिंग्स लावण्यात आले आहे. प्रत्येक रुमचे इंटेरिअर दुसऱ्या रुमपेक्षा वेगळे आहे.


पुढील स्लाईड्समध्ये बघा, अक्षय कुमारच्या भव्य आशियानाचे खास फोटोज...

Next Article

Recommended