आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरुणने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये केली डिग्री प्राप्त, भेटा Highly Educated 15 सेलिब्रिटींना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अल्पावधतीच बॉलिवूड आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सामील झालेला वरुण धवन आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. 24 एप्रिल 1987 रोजी दिग्दर्शक डेविड धवन यांच्या घरी वरुणचा जन्म झाला. 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे वरुणने फिल्मी दुनियेत एन्ट्री घेतली. 'मैं तेरा हीरो', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बदलापूर', 'दिलवाले', 'एबीसीडी 2', 'ऑक्टोबर' या सिनेमांत तो झळकला आहे. आता तो आगामी 'टोटल धमाल', 'सुई धागा' या चित्रपटांत झळकणार आहे.  

 

खरं तर अभिनयासाठी उच्च शिक्षणाची गरज नसते. मात्र  वरुणने अभिनयात नशीब आजमावण्यापूर्वी आपले शिक्षण पूर्ण केले. केवळ वरुणच नव्हे तर बॉलिवूडमध्ये आणखी काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी  अभिनयात नशीब आजमावण्यापूर्वी शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला. काही सेलिब्रिटींनी तर केवळ एखाद्या विषयात केवळ आवड होती म्हणून पदवी प्राप्त केलेली आहे. 

 

वरुण धवनः परदेशातून घेतली बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिग्री 
'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणा-या वरुण धवनने यूकेतील नॉटिंघम युनिव्हर्सिटीतून बिझनेस मॅनेजमेंट या विषयाची पदवी प्राप्त केली आहे. भारतात आल्यानंतर त्याने करण जोहरचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणे सुरु केले होते.

 

पुढील स्लाईड्समध्ये, भेटा बॉलिवूडमधील उच्चशिक्षित सेलिब्रिटींना...

बातम्या आणखी आहेत...