Home »Gossip» Varun Dhawan Leaving His Father House For Girlfriend Natasha

गर्लफ्रेंडसाठी वरुण धवनने सोडले वडिलांचे घर, विरोधात जाऊन नव्या घरात लवकरच होणार शिफ्ट !

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 11:15 AM IST

मुंबई - एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिल्यानंतर वरुण धवन बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. नुकतेच वरुणने मुंबईतील बांद्रा येथे नवीन घर खरेदी केले आहे. या घरानिमित्त दिलेल्या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलेब्स पोहोचले होते. यावेळी वरुणची गर्लफ्रेंड नताशा दलालही उपस्थित होती. आता अशी चर्चा आहे की वरुण लवकरच वडिलांचे घर सोडून नव्या घरात शिफ्ट होणार आहे. या कारणाने सोडत आहे वडिलांचे घर...

- एका प्रसिद्ध एंटरटेनमेंट साईटला दिलेल्या मुलाखतीनंतर असे समोर आले आहे की, वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या जवळीकीने त्याची गर्लफ्रेंड नताशा परेशान आहे.
- सतत बिझी शेड्युलमध्ये असल्यामुळे वरुण धवन आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये सतत भांडण होत आहे. वरुणने सध्या 'अक्टूबर'चित्रपटाची शूटिंग संपवली आहे आणि सुईधागाचे शूटिंग करत आहे.

- यादरम्यान त्याने वडिलांचे घर सोडून नव्या घरात शिफ्ट होण्याचे ठरवले आहे. यामुळे ते दोघे एकमेकांना जास्त वेळ देऊ शकेल.

शाळेपासूनची मैत्रीण आहे नताशा..
- वरुण आणि नताशा लहानपणापासून सोबत आहेत. दोघे एकाच शाळेत शिकले आहेत.
- दोघांना अनेक इवेंट आणि पार्टीत सोबत पाहण्यात आले आहे.

वडिलांनी लिव्ह-इनमध्ये राहण्यास केला विरोध..
- वरुणचे वडिल डेव्हिड धवन यांना वरुणचा लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय पसंत नव्हता पण आता वरुणने स्वतःचे घर घेतले आहे त्यामुळे लवकरच हे दोघे लवकरच सोबत शिफ्ट होणार आहे.

या चित्रपटात केले आहे काम...
-वरुणने 2012 साली स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटाने करिअरची सुरुवात केली होती. आतापर्यंत त्याने मैं तेरा हीरो, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, बदलापुर, ABCD-2, दिलवाले, ढिशूम, बद्रीनाथ की दुल्हनिया, जुडवां-2 चित्रपटात काम केले आहे.

पुढच्या स्लाईडवर पाहा, वरुण धवनचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे काही खास PHOTOS...

Next Article

Recommended