आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Veere Di Wedding Actor Sumeet Vyas Getting Second Time Married Soon With TV Actress Ekta Kaul

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुस-यांदा लग्न थाटतोय करीना कपूरचा हा को-स्टार, 7 वर्षांनी लहान आहे दुसरी पत्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आगामी 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटात करीना कपूरच्या प्रियकराची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित व्यास दुस-यांदा लग्न करत असल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, सुमित टीव्ही अभिनेत्री एकता कॉलसोबत येत्या सप्टेंबर महिन्यात लग्न थाटणार आहे. दोघांनी याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याचे समजते. सुमित 34 वर्षांचा तर त्याची होणारी दुसरी पत्नी ही 27 वर्षांची आहे. दोघांमध्ये 7 वर्षांचे अंतर आहे. 


या अभिनेत्रीसोबत झाले होते सुमितचे पहिले लग्न...

- सुमितचे पहिले लग्न अभिनेत्री शिवानी टंकसलेसोबत झाले होते. पण 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.
- घटस्फोटानंतर शिवानीने कानन मल्होत्रासोबत साखरपुडा केला होता. पण साखरपुड्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. 
- शिवानीने 'द डर्टी पिक्चर', 'तलाश', 'एक पहेली लाला' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
- घटस्फोटानंतर आता सुमितनेही त्याच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि एकतासोबत आता तो लग्न थाटतोय.
- एकताने 'रब से सोना इश्क'(2012), 'बडे अच्छे लगते हैं' (2014), 'ये है आशिकी'(2014), 'एक रिश्ता ऐसा भी' (2015), 'मेरे अंगने में' (2017) या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

 

या चित्रपटांमध्ये झळकला आहे सुमित...
- सुमीत व्यास मुळचा दिल्लीचा आहे. त्याचे वडील ‘नॅशनल ड्रामा स्कूल’चे विद्यार्थी होते.
- सुमितने  एका रोड ट्रीप वर आधारित 'ट्रिपलिंग' नावाच्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तो या सीरिजचा को-रायटरसुद्धा होता. आतापर्यंत तो 'पार्च्ड', 'गुड्डू की गन', 'औरंगजेब', 'आरक्षण' या चित्रपटांमध्ये झळकला आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, सुमितची पहिली पत्नी आणि भावी पत्नीचे PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...