आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसॉर्टचे Inside Photos: टस्कनीत येथे झाले विराट-अनुष्काचे लग्न, एका दिवसाचे भाडे आहे 14

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बोर्गो फिनोसिएतो (इटली) : इटलीतील टस्कनी येथे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे प्रेमीयुगुल विवाहबद्ध झाले. अगदी मोजक्या नातेवाकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. विराट-अनुष्काने इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केले. यासाठी त्यांनी जगातील दुस-या क्रमांकाच्या सर्वात महागड्या रिसॉर्टची निवड केली. इटलीतील टस्कनीस्थित बोर्गो फिनोसिएतो रिसॉर्टमध्ये हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. याच ठिकाणी त्यांचा साखरपुडा, मेंदी, हळदी आणि लग्नसमारंभ पार पडला. या रिसॉर्टचे भाडे ऐकून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. 

 

एका दिवसासाठी मोजावे लागतात सुमारे 14 लाख रुपये... 
- बोर्गो फिनोसिएतो रिसॉर्टमध्ये 22 खोल्या असून येथे 44 लोकांची व्यवस्था आहे.
- इटलीच्या मिलान शहरापासून हे ठिकाण 300 किलोमीटर अंतरावर आहे. तर इटालियन स्टेशन सिएनापासून हे ठिकाण केवळ 34 किलोमीटर दूर आहे.  
- फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमस आणि नवीव वर्षाच्या काळात बोर्गो फिनोसिएतो रिसॉर्ट हे जगातील दुसरे महागडे रिसॉर्ट आहे. 
- या काळात हे रिसॉर्ट दर आठवड्याला 94,83,210 रुपये भाडे घेते. याचाच अर्थ दर दिवासामागे 13,54,744 रुपये इतके भाडे मोजावे लागतात.
- बोर्गो फिनोसिएतो हे आठशे वर्षांपूर्वी वसलेले गाव आहे. काही वर्षांपूर्वी जॉन फिलिप्स याने या गावाचा कायापालट केला. 
- फ्लोरेन्स विमानतळपासून तासाभराच्या अंतरावर टस्कनीतील निसर्गरम्य ठिकाणी बोर्गो रिसॉर्ट आहे. 
- या रिसॉर्टमध्ये स्विमिंगपूल, जीम, स्पा, टेनिस कोर्टची सुविधाही यात आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, अनुष्का-विराटच्या लग्नासाठी सजलेल्या या रिसॉर्टचे इनसाइड फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...