आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Pix: अनुष्का-विराट या घरात करणार संसाराला सुरुवात, 5BHK फ्लॅटची किंमत आहे 34 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशी विवाहबंधनात अडकल्यानंतर अनुष्का आणि विराट मुंबईत स्थायिक होणार की दिल्लीत हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. पण आता याचे उत्तर मिळाले आहे. अनुष्का आणि विराट यांनी गेल्याचवर्षी म्हणजे 2016 मध्ये मुंबईत घर खरेदी केल्याचे वृत्त आहे. लग्नानंतर थोडा ब्रेक घेऊन हे दोघेही पुन्हा एकदा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठी त्यांनी मुंबईतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. 


- ‘बिझनेस टुडे’ने  प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 2016 मध्ये या दोघांनी मुंबईत एक सी फेसिंग घर खरेदी केले आहे. 
- मुंबईत‘ओमकार रिलेटर्स अॅण्ड डेव्हलपर्स रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट’ अंतर्गत वरळी येथे साकारण्यात आलेल्या ‘ओमकार 1973’ या टॉवरमध्ये एक प्रशस्त घर खरेदी केले आहे. 
- 7171 स्वे. फूट असलेल्या या घराची किंमत तब्बल 34 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. हे 5 BHK अपार्टमेंट आहे. 
- विराट-अनुष्काचा हा नवीन आशियाना सी फेसिंग असून टॉवरच्या 35 व्या मजल्यावर आहे.  
- 13 फूट उंचीची प्रत्येक खोली असणाऱ्या या घरातून संपूर्ण शहराची सुरेख झलकही दिसणार असल्याचे म्हटले जातेय.

 

युवराद सिंग आहे शेजारी..
- विशेष म्हणजे याच टॉवरमध्ये क्रिकेटपटू युवराज सिंगनेही घर घेतले आहे. 2014 मध्ये टॉवरच्या 29 व्या मजल्यावर युवराजने फ्लॅट खरेदी केला.  
- सध्या अनुष्का आणि विराट यांच्या या नवीन घराचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


पाहुयात, कसा आहे नवदाम्पत्याच्या आलिशान आशियाना.... 

बातम्या आणखी आहेत...