आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काच्या नव-याने शेअर केला नवीन घराचा फोटो, बालकनीतून असे दिसते मुंबई शहर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीने नवीन घरातील बालकनीचा हा फोटो शेअर केला आहे. - Divya Marathi
विराट कोहलीने नवीन घरातील बालकनीचा हा फोटो शेअर केला आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मुंबईतील त्यांच्या 5BHK सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत. विराटने अलीकडेच नवीन घराच्या बालकनीचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत त्यांच्या बालकनीतून मुंबईचा व्ह्यू दिसतो. फोटो शेअर करुन विराटने ट्वीट केले,'Where else would you wanna be when you have such a stunning view from home! 😇♥️'. 


34 कोटी आहे घराची किंमत.... 

अनुष्का-विराट यांच्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल 34 कोटी इतकी आहे. विराटने लग्नापूर्वी म्हणजे 2016 मध्ये मुंबईतील वरळी भागातील ओंकार-1973 बिल्डिंगमध्ये 5BHK लग्झरी अपार्टमेंट बूक केले होते. त्याचा हा फ्लॅट 7,171 स्क्वेअर फूट आहे. बूक करताना या फ्लॅटची किंमत 34 कोटी इतकी होती. विराट आणि अनुष्का यांचा हा नवीन आशियाना सी-फेसिंग अपार्टमेंटच्या 35 व्या मजल्यावर आहे. युवराज सिंग त्यांचा शेजारी आहे. युवराजने 2014 मध्ये या बिल्डिंगच्या 29 व्या फ्लोअरवर फ्लॅट खरेदी केला होता.


शूटिंगमध्ये बिझी आहे अनुष्का... 
अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी 'सुई-धागा' आणि 'झिरो' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  तर विराट सध्या ब्रेक घेऊन घरी परतला आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, अनुष्का-विराट यांच्या घराचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...