आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अनुष्का-विराटने 11 डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केले. कपलने इंडियात पहिले रिसेप्शन दिल्लीमध्ये दिले त्यानंतर 26 डिसेंबरला दुसरे रिसेप्शन मुंबईत झाले. यामध्ये बॉलिवूड सेलेब्ससोबत क्रिकेट जगतातील अनेक सेलेब्स उपस्थित होते. अनुष्का-विराटची लव्हस्टोरी ही तब्बल 4 वर्षे चालली आणि त्यांनतर त्यांनी लग्न केले. 2013 मध्ये एका अॅड शूटच्या दरम्यान या दोघांची भेट झाली होती. अशाच प्रकारे क्रिकेट आणि बॉलिवूडचा रोमान्स याआधी एका जोडीचा होता. त्यांची लव्हस्टोरी अनुष्का-विराट कपलसारखीच होती. ती जोडी होती क्रिकेटर टायगर पतोडी आणि अॅक्ट्रेस शर्मिला टागोर. त्यांनी देखील 4 वर्षे एकमेकांना डेट केले होते.
अशी झाली होती शर्मिला-टायगरची पहिली भेट
- दोघांची पहिली भेट 1965 मध्ये दिल्लीत एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. तेव्हा शर्मिला या एका फिल्मच्या शूटिंगसाठी दिल्लीत आल्या होत्या. त्याचवेळी टायगर पतोडी दिल्लीत होते.
- पहिल्या भेटीनंतर टायगर पतोडींनी शर्मिला यांना एक फ्रिज गिफ्ट केले होते. त्याकाळातील ते महागडे गिफ्ट मानले जात होते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कशी भेट झाली अनुष्का-विराटची...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.