आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 50व्या वर्षी दिसला होता श्रीदेवीचा बोल्ड लूक, पाहा PHOTOSHOOT

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी शनिवारी रात्री जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालावली. त्या 54 वर्षांच्या होत्या. दुबईमध्ये लग्न समारंभासाठी गेलेल्या असताना त्यांना मृत्यूने गाठले.13 ऑगस्ट 1963 रोजी जन्मलेल्या श्रीदेवीने गेल्यावर्षी वयाची 54 वर्षे पूर्ण केली होती. हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमधील सिनेमांमध्ये श्रीदेवीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. वयाच्या 50 व्या वर्षी श्रीदेवीने व्होग मॅगझिनसाठी एक ग्लॅमरस फोटोशूट करुन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. व्होगच्या ऑगस्ट 2013 महिन्याच्या अंकासाठी श्रीदेवीने डोळे दिपवणारे फोटोशूट केले होते.


श्रीदेवीने यावेळी वयाची 51 वर्षे पूर्ण केलेली होती. तरीदेखील तिच्या सौंदर्यावर वाढत्या वयाचा परिणाम झालेला दिसत नव्हता. श्रीदेवी केवळ दिसायला सुंदरच नाही तर तिचा फॅशन सेन्ससुद्धा जबरदस्त होता. कोणता लेटेस्ट ट्रेंड सुरु आहे आणि कोणती फॅशन आपल्या सूट होईल, हे श्रीदेवीला चांगलेच ठाऊक होते. मग इंडियन स्टाइल असो किंवा वेस्टर्न, श्रीदेवीचा अंदाज आजच्या तरुण अभिनेत्रींपेक्षा वेगळा असायचा. ती प्रत्येक स्टाइलमध्ये लाजवाब दिसायची.


या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला श्रीदेवीची वयाच्या 50 व्या वर्षी केलेल्या फोटोशूट्सचे खास छायाचित्रे दाखवत आहोत.. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा श्रीदेवीचा भूरळ पाडणारा ग्लॅमरस अंदाज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...