आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • What Is Priyanka Chopra Wearing To The Royal Wedding Of Prince Harry And Meghan Markle? Here The Detail

ब्रिटेनच्या रॉयल वेडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली प्रियांका, नववधूने दिले निमंत्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ब्रिटेनच्या राजघरान्यामध्ये सध्या लग्नाची धूम आहे. महाराणी ऐलिजाबेथचा लहान नातू प्रिंस हॅरी 19 मे रोजी मेगन मर्केलसोबत लग्न करणार आहे. या लग्नात जगभरातून जवळपास 600 हायप्रोफाइल लोक सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रियांका चोप्रा सहभागी होणार आहे. ती या रॉयल वेडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी लंडनसाठी निघाली आहे. विशेष म्हणजे प्रियांकाला स्वतः नववधू मेगनने निमंत्रण दिले आहे.


लग्नात  Fascinator लूमध्ये दिसू शकते प्रियांका...
- प्रियांका या लग्नात कोणत्या ड्रेसमध्ये दिसणार यावर आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
- कारण मेट गाला असो किंवा ऑस्कर किंवा मग एखादी मुलाखत. यावेळी प्रियांका आपल्या लूकवर खुप लक्ष देत असते. तिचा ड्रेस सर्वांचेच लक्ष वेधून घेतो.
- अंदाज लावला जातोय की, ती मोडेस्ट ड्रेससोबत स्टायलिश हॅट कॅरी करु शकते. रिपोर्टनुसार ती अनेक प्रसिध्द मार्केटमध्ये हॅट सर्च करताना दिसली आहे.
- प्रियांकाने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते, "मला एक Hat घालावी लागेल. लवकरच मी या नवीन लूकमध्ये दिसेल."
- "माझ्या एका फ्रेंडने मला  Fascinator चा सल्ला दिला आहे. हे काय असते ते मला माहिती नाही. यामुळे मी गूगल केले आणि याचा अर्थ जाणून घेतला."
- "सर्च केल्यानंतर मला वाटले की, मी आता यामध्ये फिट नाही. मी या लहान टोपीवषयी विचार करुनच टेंशनमध्ये आलेय."
- प्रियांका या लग्नासाठी खुप तयारी करत आहे. ती नेहमीच इव्हेंट, रेड कार्पेटवर स्टनिंग लूक्समध्ये दिसत असते.
- सध्या ती फ्लोरल मिडी आणि स्कर्टच्या न्यू कोम्बोमध्ये जास्त दिसतेय. या लग्नात ती काही तरी खुप छान घालणार आहे असा अंदाज लावला जातोय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रियांकाचे स्टनिंग लूकचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...