आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाकिस्तानी महिलेबरोबर दिलीप कुमार यांनी केले होते दुसरे लग्न, हे होते यामागचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार 95 वर्षांचे झाले आहेत. 11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जन्मलेल्या दिलीप कुमार यांचे खासगी आयुष्य काहीसे वादग्रस्त राहिलेले आहे. सायरा बानो यांच्याशी विवाहानंतर 16 वर्षांनी त्यांनी जेव्हा पाकिस्तानच्या आसमा रेहमान यांच्याशी दुसऱ्यांदा निकाह केला तेव्हा ते चर्चेत आले होते. सायरा बानो आई होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी दुसरे लग्न केले अशी चर्चा त्यावेळी होती.

 

यामुळे करावे लागले दुसरे लग्न
आसमा आणि दिलीप कुमार यांचे अफेयर दीर्घ काळ चालले असे सांगितले जाते. एकदा तर त्या दोघांना सायरा बानो यांनी स्वतः पकडले होते असे म्हटले जाते. मात्र दिलीप कुमार यांनी नंतर ते फेटाळून लावले. लोकांच्या प्रश्नांना घाबरून दिलीप कुमार यांनी घराबाहेर निघणेही बंद केले होते, अशाही चर्चा होत्या. आसमा आणि दिलीप कुमार यांची भेट हैदराबादेत एका क्रिकेट मॅचदरम्यान झाली होती. 1980 मध्ये त्या दोघांनी लग्न केले आणि 1982 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पण आसमा धोका देत असल्याने दिलीप कुमार यांनी तिला तलाक दिला आणि पुन्हा सायरा बानो यांच्याकडे परतले.

 

यामुळे बनू शकले नाहीत पिता..
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना मूलबाळ नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. पण फार कमी लोकांना त्यामागचे कारण माहिती आहे. दिलीप कुमार यांनी त्यांचे आत्मचरित्र 'द सबस्टान्स अँड द शॅडो' मध्ये याबाबत लिहिले आहे. पुस्तकात दिलीप कुमार यांनी म्हटले आहे की, 1972 मध्ये सायरा सर्वात आधी प्रेग्नंट होत्या. त्यावेळी त्यांच्या गर्भात मुलगा होता, हे आम्हाला नंतर समजले. 8 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सायरा यांना रक्तदाबाचा त्रास जाला. त्यावेळी गर्भाची वाढ जवळपास पूर्ण झाली होती. पण बाळाला वाचवण्यासाठी सर्जरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे श्वास कोंडून बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सायरा बानो कधीही आई बनू शकल्या नाहीत. जेव्हा मीडियात याबाबतची चर्चा सुरू झाली तेव्हा बाळासाठी दिलीप कुमार यांनी असे पाऊल उचलले अशा बातम्या समोर येत होत्या. पण खरे कारण नंतर दिलीप कुमार यांनी आत्मचरित्रात सांगितले.

 

1966 मध्ये केला होता सायराबरोबर विवाह... 
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे लग्न 11 ऑक्टोबर 1966 ला झाले होते. सायरा दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान होत्या. सायरा बानो वयाच्या 8 व्या वर्षापासून दिलीप कुमार यांच्याशी लग्नाचे स्वप्न पाहत होत्या, असे समोर आलेले आहे. 1952 मध्ये रिलीज झालेला 'दाग' चित्रपट पाहिल्यानंतर त्या त्यांच्यावर फिदा झाल्या होत्या.

 

गेल्या 51 वर्षांपासून दिलीपकुमार आणि सायरा बानो एकमेकांची साथ देत आहेत...पुढील स्लाइड्सवर पाहा या दोघांचे PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...