आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्त यांच्यासोबत काम करायची श्रीदेवींना वाटायची भीती, समोर आले होते हे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. वयाच्या 54 व्यावर्षीच त्यांना मृत्यूने गाठले. शनिवारी रात्री दुबईमध्ये ही घटना घडली. त्यांच्या अकाली जाण्याने संपुर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. 2017 मध्येच श्रीदेवींने चित्रपट सृष्टीत 50 वर्ष पुर्ण केले होते. 1967 मध्ये त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्यावर्षी 'थुनइवन' या चित्रपटात काम केले होते. या कारणांमुळे संजय दत्तसोबत काम करण्यास घाबरत होत्या श्रीदेवी...
 
श्रीदेवी यांच्या 50 वर्षांच्या चित्रपट करिअरमध्ये अनेक इंट्रेस्टिंग घटना घडल्या. एकदा 'हिम्मतवाला' (1983) चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी संजय दत्त अचानक श्रीदेवीच्या हॉटेलच्या रुममध्ये पोहोचले आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागले. श्रीदेवीने गेट उघडले तेव्हा संजयला नशेत पाहून त्या खुप घाबरल्या. संजय याच अवस्थेत त्यांच्या खोलीत गेले.
 
- त्यावेळी संजय दत्त श्रीदेवीचा मोठा फॅन होता. ज्यावेळी त्यांना कळाले की, श्रीदेवी जितेंद्रसोबत 'हिम्मतवाला' ची शूटिंग करत आहेत, तेव्हा ते त्यांना भेटायला सेटवर गेले होते.
- संजय दत्त खुप दारु प्यायला होता आणि लगेच श्रीदेवीच्या खोलीपर्यंत पोहोचला होता.
- एका मुलाखतीत संजयने सांगितले की, श्रीदेवीच्या खोलीमध्ये जाऊन मी कसा वागलो, हे मला लक्षात नाही. पण यामुळे श्रीदेवी खुप घाबरल्या आणि त्यांनी मला पाहू दरवाजा बंद केला.
- संजय दत्त आणि श्रीदेवीची ही पहिली भेट होती. परंतू श्रीदेवी यामुळे इतक्या घाबरल्या होत्या की, त्यांना संजयसोबत चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, हॉटेलच्या किस्स्यापुर्वीच श्रीदेवी-संजयने साइन केली होती एक फिल्म...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...