आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री होती जॅकी श्रॉफची पत्नी, बॉलिवूडमध्ये या अभिनेत्यासोबत दिले होते बोल्ड सीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा दत्त श्रॉफ ही मॉडेलसोबतच चित्रपट निर्माती आहे. तिने अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर आणि कतरिना कैफ स्टारर 'बूम' (2003) या वादग्रस्त ठरलेल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. याशिवाय 'जिस देश में गंगा रहता है' (2000)', ग्रहण' (2001) आणि 'बोम्बिल एंड बीट्राइस'(2007) या चित्रपटांचीही ती निर्माती आहे. आयशाने अभिनेत्री म्हणूनही मोठ्या पडद्यावर काम केले आहे. 


अभिनेत्री म्हणून केले एकमेव चित्रपटात काम...
- आयशाने अभिनेत्री म्हणून केवळ एकाच चित्रपटात अभिनय केला होता. 1984 मध्ये आलेल्या 'तेरी बाहों में' या चित्रपटात आयशा लीड अॅक्ट्रेस म्हणून झळकली होती. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता मोहनिश बहल मुख्य भूमिकेत झळकला होता. चित्रपटात नवीन निश्चल आणि प्रेम चोप्रा यांच्याही मुख्य भूमिका होत्या.
- उमेश मेहरा दिग्दर्शित हा चित्रपट प्रमोद पोद्दार यांनी प्रोड्युस केला होता.


काय होती चित्रपटाची कथा...
- चित्रपटाची कथा आयशा आणि मोहनीश यांच्या व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आली होती. हे दोघे एका जहाज यात्रेला निघतात. पण जहाज बुडाल्याने दोघे एका आयलँडवर अडकतात. या आयलँडवर एक माकड त्यांना भेटतो, हे दोघे त्या माकडाला आपल्यासोबत ठेवतात. त्याचे नाव हे दोघे कालू असे ठेवतात. 20 वर्षे या दोघांचा शोध घेतला जातो. यादरम्यान कथेत अनेक चढउतार येतात.
- हा चित्रपट 'द ब्लू लॅगून' या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. आयशा आणि मोहनिश यांच्यावर चित्रपटात अनेक स्टिमी सीन्स चित्रीत करण्यात आले होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, चित्रपटातील काही स्टिल्स आणि पोस्टर्स...  

बातम्या आणखी आहेत...