आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर खान हिने 2000 मध्ये ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटात तिच्या अपोझिट अभिनेता अभिषेक बच्चन होता. अभिषेकनेदेखील याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात अभिषेकचा अभिनय फारसा पसंत केला नाही, मात्र करrनाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले. पण या चित्रपटात रोमँटिक सीन्स द्यायला करीनाने चक्क नकार दिला होता. अभिषेक भावासारखा असल्याचे करीनाने दिग्दर्शक जे पी दत्ता यांना म्हटले होते.
जुन्या व्हिडिओतून समोर आले हे रंजक फॅक्ट्स...
- सिमी ग्रेवाल यांच्या एका शोच्या एपिसोडचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या एपिसोडमध्ये करीना पाहुणी म्हणून पोहोचली होती. एपिसोडदरम्यान सिमी अभिषेक बच्चनला कॉल करतात. यावेळी अभिषेक करीनासोबतचा हा इंसिडेंट शेअर करतो. अभिषेक म्हणाला होता, की तो त्याचा चित्रपटातील पहिला रोमँटिक सीन कधीच विसरु शकत नाही.
- चित्रपटात काही सीन्समध्ये करीनाला अभिषेकसोबत जबरदस्त रोमान्स करायचा होता. अशात करीनाने दिग्दर्शकांना विचारले होते की, हे सर्व काही कसे करायचे आहे? अभिषेक तर माझ्या भावासारखा आहे.
- करीना अभिषेकलासुद्धा म्हणाली होती, की ‘मला तुझ्यासोबत रोमँटिक सीन देणे अवघड आहे. कारण तू माझ्या भावासारखा आहेस.’ अभिषेकने हेदेखील सांगितले की, करीना जेपी सर यांच्याकडे गेली होती. तिने त्यांना म्हटले की, ‘जेपी अंकल मी हे असे कसे करू, एबी माझ्या भावासारखा आहे.’
चित्रपटासाठी करीनाला मिळाला होता फिल्मफेअर अवॉर्ड...
- रिफ्युजीमध्ये करीना आणि अभिषेक यांच्याव्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि अनुपम खेर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण करीनाला चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला होता.
- चित्रपटातील 'ऐसा लगता है', 'पंची नदियां' आणि 'रात की हथेली पर' ही गाणी खूप गाजली होती. यासाठी अनू मलिक यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि जावेद अख्तर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
पुढे बघा, रिफ्युजी चित्रपटाचे काही बिहाइंड द सीन्स फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.