आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाड करणाऱ्याला रेखाने असा शिकवला होता धडा, यापूर्वी ऐकले नसतील हे किस्से

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध अॅक्ट्रेस रेखाच्या जीवनातील अनेक किश्श्यांबाबत रेखाच्या अनेक फॅन्सना फारशी काही माहिती नाही. असाच एक किस्सा मायापुरी मॅगझिनच्या 1975 च्या एका अंकात आलेला आहे. हा किस्सा रेखा 10 वर्षांची असतानाचा आहे. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने रेखाची छेड काढली होती. पण तसे करणाऱ्याला रेखाने सडेतोड उत्तर दिले होते.

 

नेमके काय घडले..
- मॅगझिनमधील माहितीनुसार रेखा तिची बहीण आणि आयाबरोबर चित्रपट पाहून परत येत होते. त्यावेळी तिला झोपही येत होती. 
- गर्दीमध्ये अचानक रेखाने बहिण आणि आयापासून वेगळी झाली आणि चुकून चालताना तिने एका अनोळखी व्यक्तीचा हात पकडला. त्याचवेळी तिला जाणीव झाली की, त्या व्यक्तीचा हात सारखा तिच्या छातीला लागत होता. 
- त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी भलतंच असल्याचे लगेचच रेखाच्या लक्षात आहे. तिने लगेचच स्वतःचा हात सोडवला आणि त्या व्यक्तीला एक लगावून दिली. 
- पाहता पाहता गर्दी जमा झाला आणि संधी मिळताच तो व्यक्ती त्याठिकाणाहून फरार झाला.

एका मुलाचा घेतला बदला...
- मॅगझिनमध्ये आणखी एक किस्सा सांगितलेला आहे. त्यानुसार एकदा रेखा सिनेमा हॉलमध्ये चित्रपट पाहत होती, त्याचवेळी मागे बसलेला एक मुलगा तिची खुर्ची सारखी हलवत होता. 
- रेखाने रागारागात खुर्ची बदलली आणि मुलाच्या मागे जाऊन बसली. त्यानंतर तिने तोंडातून च्विंगम काढले आणि त्या मुलाच्या केसांवर लावले.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, रेखाच्या जीवनाशी संबंधित इतर काही बाबी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...