आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 दिवसांनंतर नशेमधून जागा झाला होता संजय दत्त, त्याला पाहून रडत होते कुटूंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित 'संजू' हा चित्रपट 29 तारखेला रिलीज होत आहे. ज्या काळात संजय दत्त ड्रग्सच्या सवयीमध्ये होता, तो काळही यामध्ये दाखवण्यात आला आहे. संजय जवळपास 9 वर्षे ड्रग्सला बळी पडला होता. जेव्हा त्याला कळाले की, तो जिवंत राहू शकणार नाही, तेव्हा त्याने वडिलांची मदत मागितली. यानंतर त्याने अमेरिकेत जाऊन त्यावर उपचार केले आणि तिथेच सेटल होण्याचा विचार करत होता. तेव्हा सुनील दत्त यांनी सांगितले की, त्यांनी भारतात येऊन पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये ट्राय करुन पाहावे. यश मिळाले नाही तर स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगावे. यानंतर त्याने वडिलांचे ऐकले आणि मुंबईत आला.

संजयने मुलाखतीत सांगितले होते की - मी हेरोइन(ड्रग्स) चा डोज घेतला आणि झोपण्यासाठी गेलो. मी सकाळी उठलो तेव्हा सकाळ झाली होती आणि मला खुप भूक लागली होती. मला लगेच नोकराला बोललो काही तरी खाण्यासाठी घेऊन ये. यावर तो मला पाहून रडू लागला आणि म्हणाला तुम्ही दोन दिवसांनंतर उठले आहात. यामुळे तुमचे सर्व कुटूंबीय टेंशनमध्ये आहे. मी माझा चेहरा पाहिला, मी हैराण झालो. मला वाटत होते की, मी आता जगणार नाही. यानंतर मी वडिलांकडे गेलो आणि त्यांना मदत मागितली.

 

3 आठवडे अॅडमिट होता आणि नंतर रिहॅबमध्ये पाठवण्यात आले
यानंतर संजय दत्तला 3 आढवडे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट ठेवले. यानंतर त्याला उपचारासाठी अमेरिकेतील रिहॅब सेंटरमध्ये पाठवण्यात आले. अमेरिकेतून परतल्यानंतर संजय दत्तची नशेची सवय मोडली. स्वतः परेश रावलने एका मुलाखतीत सांगितले की, अमेरिकेतून परतल्यानंतर संजूने ड्रग्सला कधीच हात लावला नाही. 

बातम्या आणखी आहेत...