आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी देओलला 'छोटे पापा' म्हणायला लागली होती ट्विंकल, असे होते डिंपल-सनीचे अफेयर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सनी देओल आणि डिपल कपाडिया यांची लव्हस्टोरी 90's मध्ये चांगलीच चर्चेत होती. पहिले प्रेम म्हणजे अमृतापासून वेगळा झाल्यानंतर सनीच्या आयुष्यात डिंपल कपाडिया आली होती. त्यावेळी विवाहित (पत्नी पुजा) असूनही सनीने डिंपलला बायकोचा दर्जा दिला होता. दोघांनी गुपचूप लग्न केले होते, असेही म्हटले जाते. एका पोर्टलच्या दाव्यानुसार जेव्हा सनी आणि डिंपल एकमेकांना डेट करत होते तेव्हा डिंपलच्या मुली ट्विंकल आणि रिंकी खन्ना सनीला 'छोटे पापा' म्हणू लागली होती.

 

 

राजेश खन्नापासून विभक्त झाल्यानंतर सनी डिंपल आले होते जवळ
1982 मध्ये राजेश खन्नाशी घटस्फोट झाल्यानंतर डिंपल सनी देओलच्या जवळ आली होती. दुसरीकडे अमृताशी ब्रेकअप केल्यानंतर सनीही एकटा होता. त्यामुळे दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले होते. सनीची पत्नी पुजादेखिल मुंबईतच होती. पण सनी डिंपलबरोबर राहत होता. दोघांनी (सनी आणि डिंपल) त्यांची लव्ह लाइफ कॅमेऱ्यापासून लपवून ठेवली होती.

 

पण अमृताबरोबरच्या ब्रेकअपनंतर सनी आणि डिंपल यांच्या रोमान्सच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती. एकदा जेव्हा सनीला डिंपलबरोबरच्या रिलेशनशिपबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्याला राग आवरता आला नव्हता. तो म्हणाला होता, मला वाटते डिंपलकडे केक आहे आणि तो ती खात आहे. तिच्याकडे गमावण्यासारखे काही नाही, आणि तिला जे हवे होते ते तिला मिळाले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, असे झाले सनी आणि डिंपलच्या लव्ह लाइफचे ब्रेकअप..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

*
11 वर्षांनंतर असे झाले सनी आणि डिंपलचे ब्रेकअप.. 
सनी आणि डिम्पल यांचे नाते जवळपास 11 वर्षांपर्यंत टिकले. पण जेव्हा सनी देओलच्या जीवनात रवीनाची एंट्री झाली, त्यावेळी त्यांचे ब्रेकअप झाले. दोघांची पहिली भेट 'जिद्दी' (1997) च्या सेटवर झाली होती. अक्षय कुमारकडून प्रेमात धोका मिळाल्याने त्यावेळी रवीना दुःखी झाली होती. त्यावेळी सनीने तिला सहारा दिला. पण त्या दोघांचे नातेही फार दिवस टिकले नाही. 
*
सनी ने अमृतापासून लपवले होते विवाहित असल्याचे 
'बेताब' (1983) च्या शुटिंगदरम्यान सनी देओल आणि अमृता सिंग यांच्यात जवळीक वाढली होती. पण त्यावेळी सनी आणि पुजा यांचे लग्न झाले होते. पण सनीने अमृताला ही बाब सांगितली नाही. पण नंतर जेव्हा अमृताला याबाबत समजले तेव्हा तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

*
दबावाखाली केले होते लग्न 
सनीचा पहिले लग्न बिझनेस अॅग्रिमेंटवर झाले होते. 'बेताब'च्या रिलीजपूर्वी सनीच्या लग्नाची बातमी समोर येऊ नये अशी धर्मेंद्र यांची इच्छा होती. कारण त्यामुळे सनीच्या रोमँटिक इमेजवर परिणाम होण्याची शक्यता होती. चित्रपटाच्या रिलीजपर्यंत पुजा लंडनमध्येच होती. त्यावेळी सनी आणि पुजा लपून लंडनमध्ये भेटायचे. पेपरमध्ये जेव्हा लग्नाबाबत छापून आले, त्यावेळी सनीने लग्नाचे वृत्त फेटाळले होते. 

*
सनी-अमृताच्या अफेयरमुळे कुटुंबाची नाराजी 
अमृताची आई रुखसाना सुल्ताना आधीच सनीबरोबरच्या नात्यावर नाराज होती. सनीची आई प्रकाश कौरचाही या नात्याला नकार होता. त्याचे कारण म्हणजे त्यांनी सनीच्या लग्नाबाबत माहिती होती. 
*
अमृताने तोडले नाते 
सनीबाबत सत्य समजल्यानंतर अमृताने त्याच्याशी नाते तोडले. त्यानंतर तिचे नाव रवी शास्त्रीबरोबरही जोडले गेले. पण तेही नाते फार टिकले नाही. त्यानंतर अमृताच्या जीवनात सैफ अली खानची एंट्री झाली. दोघांनी 1991 मध्ये लग्न केले होते. 2004 मद्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. 
*

बातम्या आणखी आहेत...