आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदय चोप्राचा खुलासा- त्या रात्री माझ्या बेडरुममध्ये फराहला बघून मी घाबरलो होतो, त्यावर फराह म्हणाली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः उदय चोप्राने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक रंजक किस्सा शेअर केला आहे. त्याने फराह खानचा उल्लेख करुन ट्विट केले, "फराह खान सोबत एका दिवाळीच्या पार्टीत माझे एन्काउंटर झाले होते. झाले असे, की मला झोप येत होती म्हणून मी माझ्या रुममध्ये गेलो. तर बघतो काय फराह तिथे झोपली होती. मी पळत पाय-या उतरुन खाली आलो आणि माझ्या खोलीत एक मुलगी झोपली असल्याचे मी एकाला सांगितले. त्यावर सगळ्यांनी ती फराह खान असल्याचे मला सांगितले. लव्ह यू फराह. मला वाटले होते की, तू माझी बेडरुम चोरली." 


फराह म्हणाली- ती मीनाक्षी होती, मी तर आदित्यच्या खोलीत झोपले होते...  
- उदय चोप्राच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना फराह खानने लिहिले, "उदय, ती मीनाक्षी शेषाद्री होती, मी तर आदिच्या रुममध्ये झोपले होते. लव्ह यू टू" 
- यावर उत्तर देताना उदयने लिहिले, "होय, तो आदिचा बेड होता, पण आदि आणि मी एकच रुम शेअर करत होतो. तेव्हा आम्ही लहान मुले होते आणि आमची वेगवेगळी रुम नव्हती." 
- यावर प्रतिक्रिया देताना फराहने लिहिले, "ओह! तर मग मला ठाऊक नाही, की तुला मीनाक्षीने जास्त घाबरवले, की मी.. प्लीज आता याचे उत्तर देऊ नकोस."
- पण उदय थांबला नाही. त्यानेही फराहची फिरकी घेताना लिहिले, "मला मीनाक्षी तर मुळीच आठवत नाहीये. पण ती तूच होतीस. तूझे लांब पाय बेडच्या बाहेर आले होते. मी खरंच घाबरलो होतो."

 

बातम्या आणखी आहेत...