आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काने स्टेजवर विराटला केले Kiss, शाहरुखने म्हटला हा डायलॉग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे दुसरे रिसेप्शन मंगळवारी मुंबईत झाले. लोअर परेलस्थित सेंट रेगिस हॉटेलमध्ये झालेल्या रिसेप्शन पार्टीत अनुष्काने स्टेजवर विराटला किस केले. तर अभिनेता शाहरुख खानने 'जब तक है जान' या चित्रपटातील संवाद म्हटला. विशेष म्हणजे 'जब तक है जान'ऐवजी शाहरुख 'जब तक है खान...' असे म्हणताच अनुष्का-विराट यांना हसू आवरता आले नाही. 


बच्चन फॅमिलीसह पोहोचले हे सेलेब्स...  

- रिसेप्शनमध्ये शाहरुखशिवाय बच्चन फॅमिली, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान, माधुरी दीक्षित, रेखा, कंगना रनोट आणि लारा दत्ता हे सेलिब्रिटी पोहोचले होते. 
- श्रीदेवी, बोनी कपूर, करण जोहर, रणबीर कपूर, नीता अंबानी, सिद्धार्थ मल्होत्रा, बोमन इराणी, प्रसून जोशी, आदित्य रॉय कपूर, विधु विनोद चोप्रा, राजू हिराणी, रमेश तौरानी आणि ए.आर रहमान या सेलिब्रिटींनीदेखील नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
- मुंबईत झालेल्या रिसेप्शनपूर्वी 21 डिसेंबर रोजी दिल्लीतील ताज डिप्लोमेटिक येथे या दाम्पत्याने पहिले रिसेप्शन दिले होते. या रिसेप्शनला भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी, अरुण जेटली आणि अनुष्का-विराटच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती.  

 

उशीरा रात्री तीन वाजेपर्यंत चालले सेलिब्रेशन...
- सूत्रांच्या माहितीनुसार, लोअर परेलस्थित 40 मजली हायराइज हॉटेल सेंट रेगिंसच्या 9th फ्लोअरवर असलेल्या 'एस्टर बॉलरूम'मध्ये मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सेलिब्रेशन सुरु होते. 

 

ड्रिंकनंतर पाहुण्यांनी घेतला नाइट व्ह्यूचा आनंद...
- बँक्वट हॉलच्या शेजारी असलेल्या कॉरिडोरमध्ये बुफे ठेवण्यात आला होता. पाहुण्यांसाठी ड्रिंकची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. ओपन टेरेसवर ही व्यवस्था करण्यात आली होती. येथून पाहुण्यांनी मुंबईच्या नाइट व्ह्यूचा आनंद घेतला.
- रिसेप्शनमध्ये पाहुण्यांसाठी मल्टी डिशेज बुफे ठेवण्यात आला होता. सोबतच एग्जाटिक लिकर, कॉकटेल्स आणि ड्रिंक्सची व्यवस्था होती.
- सूत्रांच्या माहितीनूसार, मुंबईतील रिसेप्शनसाठी अनुष्का आणि विराट यांनी सुमारे 600 पाहुण्यांना आमंत्रित केले होते. यामध्ये बॉलिवूड आणि क्रिकेटर्सचा समावेश होता.  


पुढील स्लाईड्सवर बघा, अनुष्का-विराट यांच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचलेल्या बॉलिवूड सेलेब्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...