आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला मृत्यूने गाठले तेव्हा कुठे होती जान्हवी?, मायलेकींमध्ये होती मैत्रिणींसारखी Bonding

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडची 'चांदनी' म्हणजेच श्रीदेवी काळाच्या पडद्याआड गेली आहे. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांचे हृदयविकाराने निधन झाले. दुबईमध्ये लग्नसमारंभासाठी गेलेले असतानाच त्यांना मृत्यूने गाठले. मृत्यूसमयी त्यांचे पति बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशी कपूर त्यांच्यासोबत होती. परंतू जान्हवी कपूर यावेळी उपस्थित नव्हती. श्रीदेवी शेवटच्या क्षणी जान्हवीला पाहू शकली नाही. सर्व कपूर फॅमिली मोहित मारवाहच्या लग्नासाठी 'दुबई' मध्ये होती. फक्त जान्हवी या लग्नात हजर राहू शकली नाही. 

 

कुठे होती जान्हवी?
'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'ची शूटिंग सध्या सुरु आहे. शूटिंगच्या डेट्स अॅडजस्ट न झाल्यामुळे जान्हवी दुबई येथे लग्नाला गेली नव्हती असे वृत्त आहे. दुबईमध्ये लग्नसमारंभानंतर श्रीदेवीला मृत्यूने गाठले. यावेळी जान्हवी जवळ नव्हती.

 

मुलीच्या पदार्पणासाठी उत्साहित होती श्रीदेवी
जान्हवी 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मुलीच्या पहिल्या फिल्मसाठी श्रीदेवीही उत्साहित होती, ती स्वतः जान्हवीला घेऊन उदयपूरमधील बर्डव्हिलेज मेनार येथे पोहोचली होती. प्रोड्यूसर करण जोहर टीमसह मेनार येथे पोहोचला होता. या फिल्ममध्ये शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर लीड रोलमध्ये आहे. गावातील ब्रहम सागर किनाऱ्यावर असलेल्या 52 फूट उंच शिव प्रतिमेच्या पूजेने शूटिंगला सुरुवात झाली होती. शूटिंगच्यावेळी श्रीदेवीही जान्हवीसोबतच होती. 'धडक'चे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहे. ही फिल्म 6 जुलै 2018 ला रिलीज होणार आहे.

 

मुलींसोबत मैत्रिणींसारखी राहायची श्रीदेवी
श्रीदेवी नेहमी मुलींसोबतच स्पॉट व्हायची. जान्हवी आणि खुशीसोबत श्रीदेवीचे मैत्रिणीसारखे नाते होते. पेज थ्री पार्टी असू देत किंवा डिनर या मायलेकी नेहमी सोबतच दिसायच्या. मुलींसाठी श्रीदेवी मार्गदर्शक होती यासोबतच फॅशन आयकॉनही होती. श्रीदेवी प्रमाणेच तिच्या मुलीही तितक्याच ग्लॅमरस आहेत. 

 

मुलींसोबत अशी होती श्रीदेवीची Bonding, पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवीचे मुलींसोबतचे खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...