आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Family Pics: दोन मुलांची आई आहे एकेकाळची ही ग्लॅमरस अॅक्ट्रेस, मुलांसोबत करते अशी एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः आपल्या अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आता 46 वर्षांची असून खासगी आयुष्यात आईची भूमिका पार पाडताना दिसतेय. आज (22 जानेवारी) नम्रताचा वाढदिवस आहे. साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्नानंतर नम्रताने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि वैवाहिक आयुष्याकडे लक्ष केंद्रित केले.  नम्रता आणि महेश यांना गौतम आणि सितारा ही दोन मुले आहेत. गौतम 11 वर्षांचा तर सितारा 6 वर्षांची आहे.  नम्रता कुटुंबासोबत हैदराबादला स्थायिक आहे. 

 

नम्रताचा पती साऊथचा सुपरस्टार आहे.लग्नानंतर नम्रता घरात तर महेश सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. महेश त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये कायम बिझी असतो. अशात नम्रता तिच्या दोन्ही मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिची पती महेशपेक्षा दोन्ही मुलांसोबतची अधिक छायाचित्रे बघायला मिळतात.  नम्रता आपल्या मुलांसोबत अनेकदा परदेशवारीलादेखील गेली आहे. कधी भारतात तर कधी सिंगापूर, रोममध्ये मुलांसोबत एन्जॉय करतानाची छायाचित्रे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आहेत. मुलांसोबत नम्रता धमाल करताना दिसते. 

 

या पॅकेजमध्ये बघुयात, नम्रताची तिच्या दोन्ही मुलांसोबतची खास छायाचित्रे...