आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगिता बालीपासून किरण खेरपर्यंत, या 6 B-Town अभिनेत्रींनी थाटले दोनदा-तीनदा लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे डान्सिंग स्टार मिथून चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस आहे. 16 जून, 1950 रोजी कोलकातामध्‍ये त्यांचा जन्म झाला 1976 मध्ये मृणाल सेन दिग्दर्शित चित्रपट 'मृगया' तूप आपल्या करिअरला सुरुवात केली. मिथून चक्रवर्ती यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाल्यास, श्रीदेवीवर त्यांचे प्रेम होते. दोघांनी लग्न केल्याचीही चर्चा बॉलिवूडमध्ये ऐंशीच्या दशकात रंगली होती. पण त्यात किती तथ्य आहे, हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. 

 

घटस्फोटित अभिनेत्रीसोबत थाटले लग्न..

मिथून चक्रवर्ती यांच्या पत्नीचे नाव योगिता बाली असून त्यांना  तीन मुले आणि एक मुलगी आहे. मिथून यांनी घटस्फोटित योगिता बालीची जोडीदाराच्या रुपात निवड केली होती. योगिता बालीचे पहिले लग्न किशोर कुमार (1976) यांच्यासोबत झाले होते. लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला. 1978 साली घटस्फोट झाल्यानंतर योगिता बालीने 1979 मध्ये मिथून चक्रवर्तीसोबत लग्न केले. या दोघांना महाक्षय चक्रवर्ती, ऊष्मे चक्रवर्ती आणि नमाशी चक्रवर्ती ही तीन मुले आहेत. योगिता आणि मिथून यांनी एका मुलीला दत्तक घेतले असून दिशानी हे तिचे नाव आहे.  'आखिरी बदला' (1989), 'राज तिलक' (1984), 'जमाने को दिखाना है' (1981), 'प्यारा दुश्मन' (1980), 'खान दोस्त' (1976), 'नागिन' (1976) हे योगिता बालीचे गाजलेले सिनेमे आहेत. 

 

अनुपम खेर आहेत किरण खेरचे दुसरे पती...

थिएटर, बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री किरण खेर  यांनी 14 जून रोजी वयाची 63 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 जून 1955 रोजी पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला. किरण यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंबीय चंदीगडला शिफ्ट झाले होते. येथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. दोनदा लग्न थाटणा-या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये किरण यांची गणना होते. किरण यांचे पहिले लग्न मुंबईतील बिझनेसमन गौतम बेरी यांच्यासोबत झाले होते. काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. किरण यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगा असून सिकंदर हे त्याचे नाव आहे. पहिले लग्न मोडल्यानतंर 1985 साली त्यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर अनुपम यांनी सिकंदरला स्वतःचे नाव दिले. सिकंदर खेर हादेखील बॉलिवूड अभिनेता आहे.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, आणखी कोणकोणत्या अभिनेत्रींनी पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर थाटला दुसरा संसार, यापैकी एका अभिनेत्रीने तीनदा लग्न केले...

बातम्या आणखी आहेत...