आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • You Will Be Shocked To Know The Price Of The Bag Priyanka Choprta Carried For Dinner

PHOTOS:प्रियांका चोप्राच्या या बॅगची किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकीत, बॉयफ्रेंडला टाकले मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड सिंगर निक जोनाससोबत असलेल्याल अफेअरमुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून प्रियांका सतत निक जोनाससोबत स्पॉट होत आहे. प्रियांका चोप्रा नुकतीच निकच्या एका फॅमिली वेडींगमध्ये सहभागी झाली होती. यानंतर तिला निकसोबत न्यूयॉर्क येथे डेटवरही पाहिले जात होते. या डेटचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यावेळी प्रियांकाने साधा निळ्या रंगाचा गाऊन घातलेला आहे आणि त्यावर व्हाईट जॅकेट घेतले आहे.

 

याशिवाय प्रियांकाच्या हातात एक लहान बॅगही दिसत आहे. Bottega Veneta या ब्रँडची ती बॅग आहे आणि या बॅगची किंमत 4 लाख 60 हजार इतकी आहे. प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये अॅक्टीव्ह आहे. निकसमोर प्रियांकाचे टशन काही औरच होते. मागील वर्षी प्रियांका आणि निक MET गालामध्ये सोबत दिसले होते. त्यावेळीसुद्धा त्यांच्या अफेअरच्या चर्चा झाल्या पण त्यांनी एकाच डिझायनरचे कपडे घालत असल्याचे सांगत अफेअरना पूर्णविराम दिला होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, निक आणि प्रियांकाचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...