आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 B-Town Celebs: कुणी क्लासमेट तर कुणी बालपणीच्या मैत्रिणीसोबत थाटला संसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यापैकी काहींनी त्यांच्या बालमैत्रीणीसोबत तर काहींनी क्लासमेटसोबत लग्न करुन संसार थाटला. यापैकीच एक अभिनेता म्हणजे जाएद खान. जाएद आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करतोय. 5 जुलै 1980 रोजी जन्मलेल्या जाएदचे लग्न मलायका पारेखसोबत झाले आहे. 2005 साली ही जोडी विवाहबद्ध झाली. मलायका जाएदची क्लासमेट होती. दोघे हायस्कूलमध्ये एकत्र शिकत होते. 


फ्लॉप ठरले जाएदचे करिअर... 
1. जाएद खानने बॉलिवूडच्या ब-याच सिनेमांमध्ये अभिनय केला. पण त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही. 2003 साली 'चुरा लिया है तुमने' या सिनेमाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. पण दुर्दैवाने त्याचा डेब्यू सिनेमाच सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर तो 'वादा' (2004), 'दस' (2005), 'शादी नं. वन' (2005), 'कॅश' (2006), 'स्पीड' (2007), 'तेज' (2012) सह ब-याच सिनेमांमध्ये झळकला.  


2. शाहरुख खान आणि गौरी

हे दोघेही टीनएज फ्रेंड आहेत. गौरीला शाहरुखने एका पार्टीत पाहिले होते. बघताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. प्रत्येक ठिकाणी शाहरुख गौरीचा पाठलाग करायचा. अखेर गौरीने शाहरुखच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि दोघे ऑक्टोबर 1991 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. शाहरुखने फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले. 'दीवाना' (1992), 'दिल आशना है' (1992), 'बाजीगर' (1993), 'डर' (1993), 'अंजाम' (1994), 'मोहब्बतें' (2000) सह त्याचे अनेक गाजलेले सिनेमे आहेत.


पुढील स्लाईड्सवर वाचा, या यादीत आणखी कोणकोणत्या सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे...  

 

बातम्या आणखी आहेत...