आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक रोशनच्या सास-यासोबत होते झीनत अमानचे अफेअर, कंटाळली होती मारहाणीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी एका बिझनेसमनवर विनयभंग आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. झीनत अमान यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी सरफराज उर्फ अमन खन्ना नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. 68  वर्षीय झीनत अमान यांच्या आरोपानुसार, 27 जानेवारी रोजी सरफराजने बिल्डिंगखाली येऊन मला धमकावलं. तसंच सुरक्षारक्षकाशी गैरवर्तन करुन त्याला मारहाणही केली. आरोपी सरफराज काही दिवसांपासून माझा पाठलाग करत होता. तसंच व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेजही पाठवत असल्याचा आरोप झीनत अमान यांनी सांगितलं. पोलिसांनी सरफराजविरोधात 354 (ड) (पाठलाग करणं), 509 आयटी अॅक्ट (महिलेला धमकी देणं) तसंच इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सरफराज सध्या पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, 38 वर्षीय आरोपी सरफराज एकेकाळी फिल्ममेकर होता. तसंच काहींच्या मते, तो रिअल इस्टेटच्या व्यवसायात सक्रीय आहे. तर मानसिकदृष्ट्या अस्थिर असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं काहींनी सांगितलं.

 

बोल्ड अभिनेत्री म्हणून होती झीनत यांची ओळख...  
19 नोव्हेंबर 1951 रोजी मुंबईत झीनत यांचा जन्म झाला. 70-80च्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री 1970 साली मिस इंडिया स्पर्धेत सेकंड रनरअप ठरली होती. 1971 साली 'हलचल' या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण करणा-या झीनत यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'हरे रामा हरे कृष्णा' हा त्यांच्या करिअरचा दुसरा चित्रपट होता. या चित्रपटातून त्यांनी यशोशिखर गाठले. त्यांनी 'शालीमार' (1978), 'यादों की बारात' (1973), 'अजनबी' 1974), 'धर्मवीर' (1977), 'छलिया बाबू' (1977), 'डॉन' (1978), 'हीरा पन्ना' (1973), 'सत्यम् शिवम् सुंदरम्' (1978) 'द ग्रेट गॅम्बलर' (1979), 'अलीबाबा और चालीस चोर' (1980), 'दोस्ताना' (1980), 'कुर्बानी' (1980), 'लावारिस' (1981), 'पु्कार' (1982) सह अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. झीनत यांना बॉलिवूडमध्ये बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. 

 

अपयशी ठरले लग्न...
झीनत यांनी 1985 मध्ये अभिनेता मजहर खानसोबत लग्न केले होते. पण त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखी राहिले नाही. लवकरच त्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या.


पुढे वाचा, अभिनेता हृतिक रोशनचे सासरे संजय खानसोबत गाजले होते झीनत यांचे अफेअर... संजय खान यांनी केली होती मारहाण... 

बातम्या आणखी आहेत...