आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षांची झाली आलिया भट, पाहा बालपणीचे CUTE PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडची क्यूट आणि बबली गर्ल आलिया भट आज 25 वर्षांची झाली आहे. आलियाचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये झाला. बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी आलियाने 2012मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. बालकलाकार म्हणून आलिया 1999मध्ये आलेल्या 'संघर्ष' सिनेमात झळकली होती.


स्टार किड असूनदेखील दिले होते ऑडिशन-
निर्माते महेश भट्ट यांची मुलगी असूनसुध्दा आलियाने आपल्या करिअरची सुरुवात होम प्रॉडक्शनमधून केली नाही. निर्माता करण जोहरच्या 'स्टुडेंट ऑफ द इअर' सिनेमासाठी जवळपास 400 तरुणींचे ऑडिशन घेण्यात आले होते. यामध्ये आलियासुध्दा सामील होती. आलियाने ऑडिशन दिल्यानंतर करण जोहरने तिला शनाया सिंघानियाच्या भूमिकेसाठी निवडले. आपल्या पदार्पण सिनेमात प्रेक्षकांची मने जिंकणा-या आलियाने आतापर्यंत हाइवे', '2 स्टेट्स', 'कपूर एंड सन्स', 'उड़ता पंजाब', 'डियर जिंदगी', 'ऐ दिल है मुश्किल' (2016), और 'बद्रीनाथ की दुल्हनिया' (2017) अशा चित्रटात काम केलेय. ती लवकरच 'राजी' आणि 'ड्रेगन' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आलिया भट्टचे क्यूट फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...