आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेटिंगच्या अफवांना कंटाळून आलियाने सोडले मौन, वाढदिवशी म्हणाली असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आलिया भट 15 मार्च ला 25 वर्षांची झाली. 1993 मध्ये तिचा जन्म झाला. सध्या ती बुल्गारियामध्ये आपला आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' ची शूटिंग करतेय. 'ब्रम्हास्त्र' च्या टिमने सेटवर तिला सरप्राइज पार्टी दिली. काही दिवसांपुर्वी बातम्या आल्या होत्या की, सिध्दार्थ मल्होत्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती रणबीर कपूरला डेट करतेय. तर दूसरीकडे अशाही बातम्या आल्या होत्या की, आलिया रणबीरला नाही तर बिझनेसमन केविन मित्तलला डेट करतेय. केविन हा एयरटेलचा मालक सुनील मित्तलचा मुलगा आहे. तो हाइक मेसेंजरचा फाउंडर आहे. डेटिंगच्या बातम्यांवर आलियाने आता मौन सोडलेय.


काय म्हणाली आलिया
- ज्यावेळी मी माझ्या डेटिंग आणि अफेअरच्या बातम्या वाचते ऐकते तेव्हा स्वतः कन्फ्यूज होते. अनेक वेळा माहितही नसते की, माझे अफेअर कुणासोबत सुरु आहे. मला वाटते की, या अफवांवर मौन बाळगणेच योग्य आहे. तसेही मला माझ्या पर्सनल आयुष्याविषयी बोलायला आवडत नाही. लोक काहीही म्हणाले तरी मला काहीच फरक पडत नाही. 


आता मीही थोडी मोठी झालेय
- यावेळी आलिया म्हणाली की, लोक मला सांगतात की, 25 वर्ष एक इम्पॉर्टेन्ट एज असते. पण मी कसे फिल करते हे मला नाही माहित. मी खुप एक्सायटेड आहे, कारण आता मी थोडी मोठी झालेय. 
- आलिया म्हणाली "मला वाटते की, वय हे फक्त हे नंबर आहे. तुमचा अनुभव तुम्हाला मॅज्योर बनवतो. खरं सांगायचे झाले तर मी अजूनही स्वतःला लहान मुलं समजते. मी मॅच्योर झाले आहे की, नाही याविषयी माझे कुटूंबिय आणि मित्रच सांगू शकतात."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, आलिया भटचे काही फॅमिली PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...