आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईवडिलांपासून वेगळी या घरात राहते आलिया भट, बघा नवीन घराचे Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आज (15 मार्च) वयाची 25 वर्षे पूर्ण करणारी अभिनेत्री आलिया भट आता आपल्या आईवडिलांपासूने वेगळी मुंबईत नवीन घरात राहते. या घरात तिच्यासोबत तिची बहीण शाहीन राहते. 


आईवडिलांपासून वेगळ्या का राहतात या दोघी बहिणी...  
आलिया भटचे बालपण वडील महेश भट आणि आई सोनी राजदान यांच्यासोबत जुहूस्थित घरात गेले आहे. मात्र आता हे घर लहान पडत असल्याने आलिया तिच्या बहिणीसोबत नवीन घरात शिफ्ट झाली आहे. एका मुलाखतीत आलियाने सांगितले, की तिचे नवीन घर आईवडिलांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावरच आहे.

 

कसे आहे आलियाच्या नवीन घराचे इंटेरिअर... 
आलियाने तिच्या नवीन घराच्या डिझायनिंगपासून ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे जातीने लक्ष दिले आहे. विकास बहलची पत्नी ऋचा बहल हिने आलियाचे घराचे इंटेरिअर केले आहे. आलिया भट आणि दिग्दर्शक विकास बहलची पत्नी ऋचाची भेट 'शानदार' या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात झाली होती. या भेटीनंतर आलियाने आपल्या घराचे इंटेरिअर ऋचावर सोपवले. कंगना रनोटच्या घराचे इंटेरिअरसुद्धा ऋचा बहलने केले होते. आलियाचे तिच्या घराच्या सजावटीविषयीचे विचार स्पष्ट होते. घराला मॉर्डन लूक न देता ते ओल्ड स्टाइलचे असावे आणि त्यातून न्यूयॉर्क लॉफ्टचा फिल यावा, असे आलियाने ऋचाला सांगितले होते.


बहिणींसाठी टी-बार..
इंटेरिअर डिझायनर ऋचा बहलने सांगितले, की दोघी बहिणी आलिया आणि शाहिन घरातील प्रत्येक वस्तूविषयी चुझी होत्या. त्यांना घरात टी-बार हवे होते. कारण दोघींही चहाच्या शौकीन आहेत. आलिया सांगते, ''मी चहासाठी वेडी आहे. त्यामुळे घरात टी बार काउंटर खास तयार करुन घेतले आहे.''


दीड वर्षांत झाले रिनोव्हेशन...
आलियाच्या घराला रेनोवेट करण्यासाठी दीड वर्षे लागली. चार बेडरुमच्या घराला तीन बेडरुममध्ये तयार करण्यात आले. ऋचाने आलियाच्या ड्रेसिंग रुमला घरातील इतर भागांपेक्षा वेगळे ठेवले आहे. ड्रेसिंग रुम अतिशय वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे, जेणेकरुन ड्रेसिंग रुममधला आवाज किंवा त्याचा त्रास कुणाला होऊ नये. ऋचा सांगते, जेव्हा आलिया तयार होते, तेव्हा ती एकटी नसते. तिची हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, आयरनिंग बॉइज तिच्यासोबत असतात. लिव्हिंग एरियाला न्यूयॉर्क लॉफ्ट आणि स्विस कॉम्बिनेशनपासून डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये व्हाइट वॉल्स, कॉन्क्रिट टाइल फ्लोअर आणि विंडोजमधून बाहेरचा नजारा स्पष्ट दिसतो. ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित काहीच आलियाला घरात नको होते.


पुढील स्लाईड्समध्ये बघा, आलिया भटच्या घराचे Inside Photos...

 

फोटो सौजन्य : Architectural Digest India

बातम्या आणखी आहेत...