आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदा सावत्र भाऊ अर्जुन कपूरच्या घरी आल्या जान्हवी-खुशी, बोनीही होते सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूर पहिल्यांदाच सावत्र भाऊ अर्जुन कपूरच्या घरी पोहोचल्या. तिच्यासोबत वडील बोनी कपूर आणि बायको अंतरा मोतीवालासोबत मोहित मारवाहसुध्दा होता. अर्जुन सध्या आपला आगामी चित्रपट 'नमस्ते इंग्लँड' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो शूटिंगमधून वेळ काढून नुकताच मुंबईत पोहोचला होता. अर्जुन घरी आल्यानंतर वडील बोनी कपूर आपल्या दोन्ही मुलींसोबत मुलाला भेटण्यासाठी पोहोचले.


श्रीदेवीच्या मृत्यूनंतर सावत्र बहिणींना सपोर्ट करतोय अर्जुन कपूर
श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जून कपूर सगळा राग विसरुन सावत्र बहिणींना सपोर्ट करतोय. येवढेच नाही तर श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी ऐकून तो शूटिंग सोडून मुंबईमध्ये पोहोचला होता. या दुःखद समयी त्याने सावत्र बहिणींना साथ दिली. फक्त अर्जुनच नाही तर त्याची बहिण अंशुलाही जान्हवी-खुशीला पुर्ण सपोर्ट करतेय. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन-अंशुला वडील बोनी कपूर यांच्या घरी शिफ्ट होण्याचा प्लान करत आहेत. कारण त्यांना दोन्ही बहिणींना एकटे सोडायचे नाही. जेव्हापासून बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत लग्न केले होते तेव्हापासून तो बहिणीसोबत वेगळा राहत होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बोनी कपूर आणि खुशी-जान्हवीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...