आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनीमधील Video शेअर करून अडकली TV अॅक्ट्रेस सारा खान, संतापले सोशल मीडिया यूजर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टीव्ही अॅक्ट्रेस सारा खान तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामपर बिकिनी फोटोज आणि एक बाथरूम व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती तिची धाकटी बहीण आयरा हिच्यासोबत बिकिनीमध्ये दिसत आहे. मात्र, व्हिडिओसमोर येताच सोशल मीडियातून तिच्यावर टिकेची झोड उठली आहे. यूजर्सनी साराला धर्मच्या नावाने ट्रोल करणे सुरु केले आहे.

 

साराच्या फोटोजवर सोशल मीडिया युजर्स घृणास्पद कमेंट्स केल्या आहेत. एवढेच नाही तर काही युजर्सनी इस्लामच्या नावाखाली तोकडे ड्रेस परिधान न करण्‍याचाही सल्ला दिला आहे. एका युजरने तर तिला धर्म बदलण्यास सांगितले आहे. 'तुला अल्लाह जरुर शिक्षा देईल', असेही त्याने आपल्या कमेंटमध्ये म्हटले आहे.

 

पब्लिसिटीसाठी साराने केला विवाह...
- 2010 मध्ये सारा खान वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. तिने रियालटी शो 'बिग बॉस-4' दरम्यान कटेस्टेंट अली मर्चेंटशी विवाह केला होता. मात्र, अवघ्या एका वर्षात तिने अलीसोबत काडीमोड केली होती.

- साराच्या एका मित्राने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, साराने या विवाहासाठी 50 लाख रुपये घेतले होते.
- दुसरीकडे, खुद्द अली मर्चेंट याने 'सच का सामना'मध्ये साराने पब्लिसिटीसाठी त्याच्यासोबत विवाह केल्याचा खुलासा केला होता.
- सारा ही मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आहे. तिने 2007 मध्ये स्टार प्लसवरील पॉपुलर शो 'सपना बाबुल का...बिदाई'मधून छोटे पडद्यावर एन्ट्री केली होती.

बातम्या आणखी आहेत...