आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांनी घायाळ करणा-या प्रियाचे नवीन फोटोशूट, गॉर्जियस लूकने वेधले लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मु्ंबईः इंटरनेटवर रातोरात स्टार बनलेली प्रिया प्रकाश ही नवोदित अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने एक नवीन फोटोशूट केले असून यामध्ये ती पिंक फ्लोरी गाऊनमध्ये अगदी डिस्नेच्या प्रिन्सेस जॅसमिनसारखी दिसत आहे. प्रियाने हे फोटोशूट एका क्लोदिंग ब्रॅण्डसाठी केले आहे. या फोटोशूटचे फोटोज प्रियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

 

बॉलिवू़डमध्ये डेब्यू करु शकते प्रिया... 

- ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटासाठी प्रियाची निवड करण्यात आली आहे. 
- या चित्रपटातून ती अभिनेता रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात तिची एक लहान भूमिका असल्याचं कळत आहे. - मुख्य म्हणजे, प्रियाची भूमिका लहान असली तरीही करण जोहरने तिच्या कामाची दखल घेणं आणि तिला ही महत्त्वाची संधी मिळणं याचा प्रियाच्या कारकिर्दीला बराच फायदा होणार आहे, असं अनेकांचच मत आहे.
- प्रियाची डेब्यू मल्याळम फिल्म ‘उरु अदार लव्ह’चा टीजर रिलीज झाला आहे. 
- या मल्याळम चित्रपटातील ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे प्रिया प्रकाश वारियर हे नाव अनेकांच्या मनात घर करुन गेलं. - चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच प्रिया वारियरला प्रसिद्धी, चाहत्यांचं प्रेम, सोशल मीडियावर सर्वाधिक असंख्य फॉलोअर्स या सर्व गोष्टींचा अनुभव घेता आला आहे.  
- पुर्वी प्रियाचा हा डेब्यू चित्रपट 3 मार्च रोजी रिलीज होणार होता. पण आता चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले असून आता चित्रपट 14 जून 2018 रोजी रिलीज होणार आहे.

 

18 वर्षांची आहे प्रिया
- प्रिया प्रकाश वारियर आता केवळ 18 वर्षाची आहे. प्रियाची आई प्रीथा यांनी सांगितल्यानुसार, प्रिया आतापर्यंत केवळ एका रॅम्प शोमध्ये झळकली.
- ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील 26 सेकंदांच्या व्हिडिओने प्रियाला एवढी लोकप्रियता मिळवून दिली, की तिने इंस्टाग्रामचा मालक मार्क झुकरबर्गला मागे टाकले. मार्कचे इंस्टाग्रामवर 4.1 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या 5 मिलियनहून अधिक झाली आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, प्रिया प्रकाशच्या नवीन फोटोशूटची खास झलक...  

बातम्या आणखी आहेत...