आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : अजय देवगनचा 'रेड' चित्रपट आज 16 मार्चला रिलीज झालाय. हा चित्रपट 1981 मध्ये यूपीच्या लखनऊमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. 2 एप्रिल 1969 मध्ये जन्मलेल्या अजयने बॉलिवूडमध्ये डार्क, एरोगेंट स्टंट आणि अॅक्शन हिरोची ओळख बनवली आहे. परंतू तो ख-या आयुष्यात तितकाच सिंपल आहे. अजय ज्यावेळी सेटवर असतो तेव्हा तो आपले क्रू मेंबर्ससोबत कॉफी, सिगारेट आणि गप्पा मारण्यात वस्त असतो. त्याच्या पॉकेटमध्ये नेहमीच सिगारेट आणि लाइटर असते. असे असूनही तो नेहमी फिट राहतो.
असा वर्कआउट करतो अजय
अजय सांगतो की, "वर्कआउट करताना मी ट्रेडमिलवर 13-14 च्या स्पीडने 14 मिनिटे धावतो. यामुळे माझी 500 किलो कॅलरी बर्न होते. याव्यतिरिक्त बेंच प्रेससोबत एकाचवेळी 500 पुश एप्स लावतो."
- "यासोबतच मी सूर्य नमस्कार करतो. खरेतर मी कोणतीच डायट फॉलो करत नाही. फक्त रात्रीच्या जेवणाकडे थोडे लक्ष देतो. मला चांगले जेवण खुप आवडते. परंतू मला ते कमीच खाता येते."
- एक फिटनेस हिरो म्हणून अजय सांगतो की, "मी सिक्स पॅक बनवण्यासाठी वर्क करत नाही. मी टोन्ड लूकवर लक्ष देतो. एक मजबूत बॉडी दिसायला हवी. माझे वर्कआउट माझ्या परिस्थितीवर डिपेंड असते. माझी कोणतीच स्टाइल नाही. मी सर्व ऑन द स्पॉट करतो."
- अजय आपल्या फिटनेसविषयी इतका अवेयर आहे की, 'सिंघम' च्या शूटिंगसाठी त्याने आपली वॅनिटी वॅन जिममध्ये कन्वर्ट केली होती.
खुप ड्रिंक आणि स्मोक करतो अजय
- अजय सांगतो की, ड्रिंकिंग आणि स्मोकिंग मला फिट ठेवते. खरेतर माझी ड्रिंकिंग आणि स्मोकिंगचा फिटनेसवर इफेक्ट होत नाही. यामुळे चित्रपटातील लोकांना आणि माझ्या कुटूंबाला याची काहीच अडचण येत नाही.
- वोडका माझी ड्रिंक आहे. हे मी रोज रात्री पाणी आणि आइससोबत घेतो. मी तरुण होतो तेव्हा रम प्यायचो, कारण ती खुप स्वस्त होती. ही गोष्ट माझ्या वडीलांना माहिती नव्हती. यानंतर मी अभिनेता बनलो आणि व्हिस्की पिणे सुरु केले. व्हिस्की प्यायल्यानंतर मला सकाळी उठून चांगले वाटत नव्हते. मग मी बकार्डी सुरु केली.
- गेल्या 15 वर्षांपासून मी वोडका घेतो. मी रात्री याचे 3-4 पेग घेतो. स्मोकिंग एक वाईट सवय आहे. परंतू याचा माझ्या ट्रेनिंगवर काहीच इफेक्ट झाला नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, अजय देवगनचा फिटनेस दाखवणारे काही PHOTOS...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.