आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : भारताचा मोस्ट पॉप्यूलर रॅपर यो यो हनी सिंह 35 वर्षांचा झालाय. 15 मार्च, 1983 साली होशियारपुर, पंजाबमध्ये त्याचा जन्म झाला. त्याचे खरे नाव हिरदेश सिंह आहे. 2000 मध्ये हनीने नवी दिल्लीच्या गुरु नानक पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पुर्ण केले. शाळेत असताना तो अमोल पालेकर यांच्या बोलण्याच्या स्टाइलला कॉपी करत होता. बालपणासूनच तो खोडकर होता आणि मिमिक्री करण्यात प्रसिध्द होता.
आजारा कंटाळून पित होता दारु
- काही वर्षांपुर्वी हनी सिंह रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतू नंतर स्वतः हनी सिंहने या चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले होते.
- हनी सिंह म्हणाला होता की, "मी बायपोलर डिसऑर्डरमुळे त्रस्त आहे हे सत्य आहे. हे सर्वच 18 महिन्यांपासून सुरु आहे. मी या काळात चार डॉक्टर्स बदलले. मी डिप्रेशनमध्ये होतो आणि औषधांचा परिणामही होत नव्हता.
- संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर मला माझ्याच घरच्या लोकांबद्दल भीती वाटायची आणि त्यामुळेच मी स्वतःला घरात कैद केले होते. अनेक महिने तर मी केसही कापले नव्हते. "
कसा आला बाहेर...
- मानसिक आजारांप्रमाणेच बायपोलर डिसऑर्डरही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यामुळे डॉक्टरांना उपचार करण्याच अडचणी येत होत्या.
- बरेच दिवस डॉक्टरला नेमके काय झाले आहे हे निदानच होत नव्हते. त्यामुळेच हनी सिंगला चार डॉक्टर बदलावे लागले.
- त्याला अनेक दिवस औषधे सूट झाली नाही. त्यामुळे हळू हळू तो नैराश्यात जाऊ लागला होता.
- नंतर डॉक्टरांच्या एका टीमने योग्य निदान केले आणि उपचार सुरू केले. हळू हळू हनी सिंग यातून बाहेर येण्यात यशस्वी ठरला.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, रॅपर हनी सिंहच्या आयुष्याविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.