आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संजू'ला नाही पूर्वायुष्याचा पश्चात्ताप, पुन्हा जगायची आहे तशीच Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - संजय दत्तचा बायोपिक 'संजू' रिलीज झाला आहे. संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर करत आहे. या बायोपिकमध्ये संजय दत्तचे वादग्रस्त जीवन दाखवण्यात आले आहे. संजयच्या जीवनावर यासीर उस्मानने 'संजय दत्त: द क्रेजी अनटोल्ड लव्ह स्टोरी ऑफ बॉलिवूड बॅड ब्वॉय' हे पुस्तक लिहिले आहे. यात संजूला त्याच्या वादग्रस्त जीवनाबद्दल पश्चात्ताप नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासीर यांनी पुस्तकात संजयशी भेटीचा उल्लेख केला आहे. यासीरने लिहिले, 2017 मध्ये एका संध्याकाळी संजयबरोबर चर्चा होत होती. तेव्हा विचारले, मागे वळून पाहताना काय बदलावेसे वाटते. संजय म्हणाला, काही नाही उलट संधी मिळाली तर पुन्हा तसे जीवन जगेल. 

 

संजय दत्तच्या जीवनातील अनेक पैलू लोकांनी पाहिले आहे. तसेच काही छुपे पैलू 'संजू' मध्ये पाहायला मिळतील. ड्रग्सची सवय, आर्म्स अॅक्ट अंतर्गत तुरुंगात जाणे, खासगी जीवनातील चढउतार हे सर्वकाही चित्रपटात असेल. 

 

नुकतेच एका मुलाखतीत निर्माते विधु विनोद चोपडा म्हणाले होते की आम्ही संजय दत्तच्या 308 गर्लफ्रेंड्स आणि अमेरिकेत भीक मागण्याच्या मुद्द्याचे सत्य जाणण्यासाठी रिसर्च केला होता. त्यानंतर संजय दत्तने आम्हाला जे काही सांगितले ते सर्व सत्य असल्याचे ते म्हणाले. 


तीन चित्रपटांत झळकणार 
- संजय दत्त 'कलंक' शिवाय इतर तीन चित्रपटांचे शुटिंगही करत आहे. त्यात तिग्मांशु धुलियाचा 'साहब, बीवी और गँगस्टर 3'चे नाव सर्वात आघाडीवर आहे. चित्रपटात संजय दत्त बरोबर जिम्मी शेरगिल, माही गिल आणि चित्रांगदा सिंहही आहेत. 
- दुसरा चित्रपट गिरीश मलिक यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा 'तोरबाज' आहे. यात संजय दत्त, नरगिस फाखरी, सुमित व्यास आणि राहुल देवही आहेत. 
- तिसरा चित्रपट अर्जुन कपूर आणि कृती सेननबरोबरचा आशुतोष गोवारीकरचा 'पानीपत' आहे. हे तिन्ही चित्रपट 2019 मध्ये रिलीज होणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...