आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत श्रीदेवीचे टॉप-20 सिनेमे, जाणुन घ्‍या कोणकोणत्‍या अॅक्‍टरसोबत केले काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सदमा' सिनेमामध्‍ये कमल हसनसोबत श्रीदेवी. - Divya Marathi
'सदमा' सिनेमामध्‍ये कमल हसनसोबत श्रीदेवी.

मुंबई- बॉलिवूड अॅक्‍ट्रेस श्रीदेवीचे वयाच्‍या 54व्‍या वर्षी दुबईमध्‍ये हार्टअटॅकने निधन झाले. पती बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशीसोबत त्‍या दुबई येथे मोहित मारवाह यांच्‍या विवाह समारंभासाठी गेल्‍या होत्‍या. श्रीदेवीच्‍या अचानक निधनाने सर्व बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 13 ऑगस्‍ट, 1963मध्‍ये शिवकाशी, तामिळनाडू येथे जन्‍मलेल्‍या श्रीदेवीने 300हून अधिक सिनेमांत काम केले आहे. 2017मध्‍ये श्रीदेवीने आपल्‍या चित्रपटसृष्‍टीच्‍या कारकिर्दीला 50 वर्षे पुर्ण केले.

 

या अॅक्‍टर्ससोबत श्रीदेवीने केले आहे काम
- आपल्‍या 51 वर्षांच्‍या फिल्‍मी करिअरमध्‍ये श्रीदेवीने अनेक अॅक्‍टर्ससोबत काम केले. यामध्‍ये कमल हसन, जितेंद्र, ऋषि कपूर, सनी देओल, अनिल कपूर, अमिताभ बच्चन, मिथुन, विनोद खन्ना, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार अशा अनेक प्रसिद्ध आणि प्रतिष्‍ठीत अॅक्‍टर्सचा समावेश आहे.
- 1983 मध्‍ये आलेल्‍या 'सदमा' आणि 'हिम्‍मतवाला' या सिनेमांनी श्रीदेवीला ओळख मिळवून‍ दिली. यानंतर तिने मवाली, कलाकार, तोहफा, नगीना, घर संसार, आखिरी रास्ता, कर्मा, मिस्टर इंडिया, गुरू, चांदनी चालबाज, फरिश्ते, लम्हे, खुदा गवाह, हीर रांझा, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, लाडला, आर्मी, जुदाई, मेरी बीवी का जवाब नहीं, इंग्लिश विंग्लिश आणि मॉम अशा अनेक उत्‍कृष्‍ट सिनेमांमध्‍ये काम केले.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कोण-कोणत्‍या प्रसिद्ध अॅक्‍टर्ससोबत श्रीदेवीने काम केले आहे...

 

बातम्या आणखी आहेत...