आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt Life Unknown Shocking Facts Which Shock Fans Sanju Spl : या व्यक्तीमुळे संजय दत्तने केली जीवनात घोडचुक, जावे लागले होते तुरुंगात!

Sanju Spl : या व्यक्तीमुळे संजय दत्तने केली जीवनात घोडचुक, जावे लागले होते तुरुंगात!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला 'संजू' हा चित्रपट येत्या 29 जून रोजी रिलीज होतोय. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरने संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारली आहे. संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले आहेत. मग ते ड्रग अॅडिक्ट होणे असो, अभिनेत्रींसोबतचे अफेअर असो किंवा मुंबई ब्लास्ट केसमध्ये नाव... एकामागून एक घटना त्याच्या आयुष्यात घडत गेल्या. या सर्व घटनांमुळे प्रेक्षक संजू या चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. 


चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक संवाद आहे,  "मैं सबकुछ हूं पर आतंकी नहीं." मुंबई ब्लास्ट केस संजयच्या आयुष्यातील एक काळा डाग आहे, त्यामुळे त्याचे आयुष्यच बदलून गेले. काही रिपोर्ट्सनुसार, संजय बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात पहिल्यांदा दुबईत अंडरवर्ल्डच्या संपर्कात आला होता. जर ही भेट घडली नसती, तर कदाचित 1993 नंतर त्याचे आयुष्य काही वेगळे असते. 


या पॅकेजमधून जाणून घेऊयात, कुठल्या व्यक्तीच्या माध्यमातून संजयची भेट दाऊदसोबत झाली होती, आणि दुबईत संजय त्यावेळी कोणत्या चित्रपटाचे शूटिंग करत होता.. त्यावेळी घडलेला नेमका किस्सा आहे तरी काय...  

 

बातम्या आणखी आहेत...