आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य पांचोलीचा कंगनावर आरोप, 30 लाख रुपये अजून केले नाही वापस..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकतेच एका मुलाखतीत कंगनाने हृतिक रोशन, आदित्य पांचोली आणि अध्ययन सुमनबाबत काही खुलासे केले आहेत. कंगनाच्या या आरोपांवर आदित्य पांचोलीने कंगनाला वेडी ठरवले आहे आणि तिच्यावर मानहानीची केस करण्याची धमकीही दिली आहे. आदित्यने कंगनावर पाण्यासारखे पैसे खर्च केल्याचा खुलासा केला आहे. 
 
ही पहिली वेळ नाही जेव्हा आदित्यने कंगनाच्या वक्तव्यावर सफाई दिली आहे. 2008 साली एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य पांचोलीने सांगितले होते की कंगना आणि मी पती-पत्नीप्रमाणे राहत होतो. मी कंगनासाठी यारी रोड येथे घर बनवत होते. आम्ही एका मित्राच्या घरी तीन वर्ष राहिलो होतो. 
 
आदित्य पांचोलीने  म्हटले 'पागल आहे कंगना'..
आदित्यने कंगनासोबतची पहिली भेट आठवत सांगितले की, "मी कंगनाला भेटलो तेव्हा तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते. मी तिला सर्वात पहिले रोडवर पाहिले होते. कंगना त्यावेळी नर्व्हस ब्रेकडाऊनची पेशंट होती. कंगना आशा चंद्रा एक्टिंग इंस्टिट्यूटच्या एका मुलासोबत बाईकवर होती. मला तिने येऊन हाय म्हटले." 
 
"तिने तिचे नाव कंगना सांगितले. मला आठवते की माझ्या एका मित्राने मला कंगनाची मदत करण्यास सांगितले होते. यानंतर कंगना मला वारंवार फोन करु लागली. सुरुवातीला ती एक लहान गावातून आलेली साधी मुलगी होती आणि मी तिच्या प्रेमात पडलो. "
 
आदित्यने कंगनावर त्याच्या पैशांचा वापर केल्याचा आरोप लावला आहे. आदित्यने सांगितले की ब्रेकअपनंतरही त्याने कंगनावर पाण्यासारखा पैसा खर्च केला. कंगनाने आदित्यकडे घर खरेदी करण्यासाठी 1 कोटी रुपये मागितले होते तेव्हा त्याने गॅरंटीयर बनून कंगनाला 50 वाखाचे लोन मिळवून दिले आणि नंतर त्याने 55 लाख कॅश दिले. आजही कंगनाकडे 30 लाख रुपये बाकी असल्याचे आदित्य सांगतो. 
 
आदित्यने कंगनावर खूप प्रेम केल्याचा दावा केला आणि त्याचा विश्वासही तोडला. आदित्यने सांगितले, "मी आमच्या दोघांसाठी घर बनवत होते. ती माझा फोन वापरायची. माझ्यासोबत असतानाही ती दुसऱ्या मुलांशी तासनतास फोनवर बोलत असे. एकदा तिने मला एक मुलगा तिला त्रास देत असल्याचे सांगितले पण जेव्हा मी टेलिफोन बील पाहिले तेव्हा त्याच मुलाथी तिने एका महिन्यात 5000 मिनिटे बोल्ली होती. पण कंगनाने तेव्हाही मला थातूरमातूर उत्तर दिले आणि 'शाकालाका बुम बुम' चित्रपटादरम्यान स्वार्थासाठी दुसऱ्या अभिनेत्याच्या जवळ गेली. "
 
कंगना रनौटने आदित्य पांचोली तिला दारु पिऊन मारहाण करत असे आणि धमकी देत असे असा आरोप केला होता. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कंगना-आदितयचे काही खास फोटोज्..
 
बातम्या आणखी आहेत...