आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्या मुलाला येतेय ऐश्वर्याच्या मुलीची आठवण, रुसल्यावर कुणी काढली त्याची समजूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या आणि आराध्या, आमिरसोबत आजाद - Divya Marathi
ऐश्वर्या आणि आराध्या, आमिरसोबत आजाद
एंटरटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये मैत्री होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु त्यांच्या मुलांमध्ये मैत्री होणे हे जरा वेगळेच आहे. परंतु तुम्हाला ठाऊक आहे, का आमिर खानचा मुलगा आजाद राव आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या चांगले मित्र आहेत. मागील काही दिवसांपासन आमिरचा लाडका मुलगा आजाद कुणाला तरी मिस करतोय.
अखेर कुणाची आठवण काढतोय आजाद...
आमिरचा चार वर्षांचा मुलगा आजाद आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या बेस्ट फ्रेंड आहे. आराध्या बेस्ट फ्रेंड आहेत. आराध्या सध्या मम्मीसोबत न्यूयॉर्कमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. त्यामुळेच आजादला आराध्याची आठवण येतेय. रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत आयोजित प्रो-कबड्डी लीगदरम्यान आजादने आई किरणला विचारले, 'आराध्या कुठे आहे?' त्याला जेव्हा कळाले, की आराध्या येथे नाहीये तर तो चक्क रुसला.
रुसल्यावर अमिताभ आणि रणबीरला घालावी लागली समजूत...
मॅचदरम्यान आराध्याचे आजोबा अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर उपस्थित होते. त्यांनी रुसलेल्या आजादची समजूत घातली. त्यांनी त्याला हसवण्यासाठी फनी अॅक्टिव्हिटीज सुरु केल्या. जेव्हा असे वाटले, की आजाद आता खेळण्यात बिझी झाला आहे, तेव्हा अमिताभ आणि रणबीर यांनीसुध्दा मोकळा श्वास घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरचा मुलगा आजाद रावचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...