आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

So Cute... ऐश्वर्याच्या मुलीचा आमिरचा मुलगा डान्स पार्टनर, अॅन्युअल डेला एकत्र केले परफॉर्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांचा चिमुकला मुलगा आझाद राव खान आणि ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या हे दोघेही एकाच शाळेत शिकतात. मुंबईतील धीरुभाई अंबानी शाळेत हे दोन्ही स्टार किड्स शिकत आहेत. आराध्या आणि आझादच्या शाळेचे नुकतेच अॅन्युअल फंक्शन झाले. या दोन्ही मुलांनी अॅन्युअल डेच्या कार्यक्रमांत सहभाग नोंदवत डान्स केला. आपल्या मुलांना स्टेजवर डान्स करताना पाहून आमिर, ऐश्वर्या आणि अभिषेकचा आनंद द्विगुणीत झाला होता. ते आपल्या मुलांना प्रेक्षकांमध्ये बसून प्रोत्साहित करत होते. या व्हिडिओमध्ये शाळेच्या अध्यक्षा नीता अंबानी यादेखील सेलिब्रिटी पालकांसह बसलेल्या दिसतात.  

रेल गाडी गाण्यावर थिरकले चिमुकले... 
शाळेतील इतर लहान मुलांसह आझाद आणि आराध्याने रेल गाडी या गाण्यावर डान्स केला. हे दोन्ही स्टार किड्स डान्स करताना खूपच छान दिसत होते. विशेष म्हणजे यावेळी ऐश्वर्या मोबाइलमध्ये तिच्या लाडक्या लेकीचा व्हिडिओ काढण्यात गुंग झाली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही बघा, चिमुकल्या आराध्या आणि आझादच्या डान्स परफॉर्मन्सची खास झलक दाखवणारा व्हिडिओ...