Home »Gossip» Aaradhya Bachchan Wears Designer Red Outfit Like Momm Aishwarya Rai

मामाच्या लग्नात रेड लहेंग्यात दिसली चिमुकली आराध्या, ऐश्वर्याचा दिसला स्टनिंग लूक

दिव्य मराठी वेब टीम | Dec 06, 2017, 12:21 PM IST

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अलीकडेच तिची लेक आराध्यासोबत मंगलोर येथे एका लग्नात सहभागी झाली होती. ऐश्वर्याच्या सख्ख्या चुलत भावाचे हे लग्न होते. लग्नात ऐश्वर्याने रेड कलरचा डिझायनर लहेंगा परिधान केला होता. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसली. आई ऐश्वर्याप्रमाणेच आराध्यानेसुद्धा रेड कलरचा लहेंगा घातला होता. या ड्रेसमध्ये आराध्या अतिशय क्यूट दिसली.

आराध्याने एन्जॉय केले मामाचे लग्न...
ऐश्वर्याचे वडील कृष्णराज यांचे धाकटे भाऊ कुमार शेट्टी यांचा मुलगा प्रांजलचे लग्न होते. या नात्याने प्रांजल ऐश्वर्याचा चुलत भाऊ आहे. 3 डिसेंबर रोजी प्रांजलचे लग्न झाले. चिमुकली आराध्या मामाच्या लग्नात एन्जॉय करताना दिसली. ऐश्वर्याची आई वृंदा राय यादेखील लग्नात सहभागी झाल्या होत्या. लग्नात ऐश्वर्या नातेवाईकांसोबत बिझी दिसली.


पुढील स्लाईड्सवर बघा, लग्नात क्लिक झालेले ऐश्वर्या-आराध्याचे फोटोज...

Next Article

Recommended