आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aaradhya’s Costume Flown Down From London! Details About Abhi Ash’s Daughter’s B’day Bash Revealed

आराध्याची B\'day Party : ऐश्वर्याने ठरवली डिस्ने थीम, लंडनहून आला बर्थडे गर्लसाठी खास ड्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोज : आई ऐश्वर्यासोबत चिमुकली आराध्या, आराध्याचा बर्थडे केक, डिस्ने थीमवर तयार केलेला डान्स फ्लोअर, आपल्या मुलासोबत जेनेलिया, सेल्फी घेताना अभिषेक बच्चन, रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी. - Divya Marathi
फोटोज : आई ऐश्वर्यासोबत चिमुकली आराध्या, आराध्याचा बर्थडे केक, डिस्ने थीमवर तयार केलेला डान्स फ्लोअर, आपल्या मुलासोबत जेनेलिया, सेल्फी घेताना अभिषेक बच्चन, रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी.
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या हिने नुकतीच वयाची चार वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने 16 नोव्हेंबरला एका जंगी बर्थ डे पार्टीचे आयोजन बच्चन कुटुंबीयांच्या जुहूस्थित प्रतिक्षा बंगल्यात करण्यात आले होते.
आराध्याच्या वाढदिवसासाठी आई ऐश्वर्याने खास तयारी केली होती. जाणून घेऊयात, आराध्याच्या बर्थडे पार्टीची काय होती खासियत...
डिस्ने थीम
ऐश्वर्याने आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी खास डिस्ने थीमची निवड केली होती. यासाठी चार दिवसांपासून तयारी सुरु झाली होती. आराध्याला बार्बी डॉल्स आणि पिंक कलर पसंत असल्याने सर्व सजावट पिंक करण्यात आली होती. ऐश्वर्याने जातीने सर्व तयारीकडे लक्ष दिले. पार्टीस्थळी सर्व गोष्टी पिंक कलरच्या होत्या. डान्स फ्लोअरसुद्धा पिंक कलरने सजवण्यात आला होता.
लंडनहून आला बर्थडे गर्लसाठी खास ड्रेस
आई ऐश्वर्याने आपल्या लेकीला प्रिन्सेस लूक देण्यासाठी खास लंडनहून ड्रेस मागवला होता. पिंक कलरच्या लाँग फ्रॉकमध्ये आराध्या अगदी प्रिन्सेससारखी दिसली.
डिस्ने थीम केक
आराध्याच्या बर्थडे केकदेखील डिस्ने थीमवरच तयार करण्यात आला होता. कॅस्टल शेपच्या केकवर प्रिन्सेस तयार करण्यात आला होता. शिवाय 'आराध्या हॅपी बर्थडे' असे लिहिण्यात आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आराध्याच्या बर्थडे पार्टीत क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...