मुंबईः अभिनेता अक्षय कुमारसोबत 'आवारा पागल दीवाना' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री आरती छाबरिया दीर्घ काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. अलीकडेच आरती कृष्णा-भारतीच्या 'कॉमेडी नाइट्स बचाओ' या रिअॅलिटी शोमध्ये सोफिया हयात आणि शेफाली जरीवालासोबत झळकली होती. अधूनमधून आरती टीव्ही शोजमध्ये हजेरी लावत असते. यापूर्वी ती 2011 मध्ये आलेल्या 'खतरों के खिलाडी सिझन 4' मध्ये केवळ स्पर्धकच नव्हती तर ती या शोची विजेतीसुद्धा ठरली होती. 2013 मध्ये तिने 'झलक दिखला जा' या शोमध्येही सहभाग घेतला होता. आरती इंस्टाग्रामवरसुद्धा अॅक्टिव असून आपले फोटोज शेअर करत असते.
'आवारा पागल दीवाना'च्या सिक्वेलमध्ये झळकणार आरती...
आरतीने हिंदू, तेलगू आणि कन्नडसह पंजाबी सिनेमांमध्ये काम केले आहे. सध्या दिग्दर्शक 'आवारा पागल दीवाना'चा सिक्वेल बनवण्याच्या विचारात आहेत. जर या सिनेमावर काम सुरु झाले, तर या सिक्वेलमधून आरती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. 2002 मध्ये आलेल्या 'आवारा पागल दीवाना' या सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी, परेश रावल, जॉनी लिव्हर, आरती छाबडिया, अमृता अरोरा आणि प्रीती झांगियानी झळकले होते.
या सिनेमांमध्ये झळकली आरती...
आरतीने लज्जा, तुमसे अच्छा कौन है, राजा भैया, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, शादी नंबर वन, सुख, तिसरी आँख, शूटआउट अॅट वडाला, पार्टनर, हे बेबी या हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. आरतीने ब्याह 70 किमी या पंजाबी सिनेमातही काम केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा आरतीचा बोल्ड अवतार...