आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेयरनेस क्रीमची अॅड करणा-या स्टार्सवर भडकला अभय देओल, जाणुन घ्या काय म्हणाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे अॅक्टर्स फेयरनेस क्रिम्सला एंडोर्स करतात त्यांच्या विरुध्द हॅप्पी भाग जाएगी अॅक्टर अभय देओलने नाराजी व्यक्ती केलीये. ज्यावेळी फेयरनेस प्रोड्क्टसच्या एंडोर्समेंटचा विषयी निघतो तेव्हा बॉलीवुड दोन भागात डिव्हाइड होते. कंगना रनोट, रणबीर कपूर आणि रणदीप हुड्डा या कँपेनमध्ये सहभागी होण्यास स्पष्ट नकार देतात. तर ए-लिस्टर्स म्हणजेच शाहरुख खान, विद्या बालन, सोनम कपूर, जॉन अब्राहम, सिध्दार्थ मल्होत्रा आणि दीपिका पादुकोण या प्रोडेक्स्ला एंडोर्स करत आहेत. अभय देओलने शाहरुख खानच्या जाहिरातीचा फोटो पोस्ट करुन नाराजी व्यक्ती करत लिहिलेय की, 'मर्द हो के लड़कियोंवाली फेयरनेस क्रीम क्यों?' याव्यतिरिक्त ज्या स्टार्सने अशा जाहिराती करुन फेयरनेस क्रिमला एंडोर्स केले आहे त्यांचे फोटो त्याने पोस्ट केले आहेत.  अभय मानतो की, अशा वेळी प्रोडेक्ट्स प्रमोट करणे म्हणजे रंगभेदाला समर्थन देण्यासारखे होते.
 
बातम्या आणखी आहेत...