Home »Gossip» Abhishek Bachchan And Aishwarya Rai Not Entered In Their Own House

अमिताभ यांच्या सून आणि नातीला मिळाला नव्हता बंगल्यात प्रवेश, कारण ठरले होते स्वतः BIG B

दिव्य मराठी वेब टीम | Oct 09, 2017, 14:00 PM IST


अलाहाबादः 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. divyamarathi.com वाचकांना याचवर्षी ऑगस्ट महिन्यात अमिताभ यांची सून ऐश्वर्या, मुलगा अभिषेक आणि नात आराध्यासोबत घडलेला एक किस्सा सांगत आहे. चक्क या तिघांना एका बंगल्यात प्रवेश नाकारण्यात आला होता आणि याला जबाबदार ठरले होते स्वतः अमिताभ बच्चन. झाले असे होते, की ऐश्वर्या राय बच्चन याचवर्षी 5 ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच अलाहाबादला गेली होती. अभिषेक बच्चन, मुलगी आराध्या, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य ऐश्वर्यासोबत अलाहाबादला आले होते. येथील ‘संगम’ घाटावर ऐश्वर्याचे वडील कृष्ण राज राय यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यात आले होते.

अलाहाबादच्या बंगल्यात मिळाला नाही अभिषेक-ऐश्वर्याला प्रवेश...
वडिलांच्या अस्थि विसर्जनानंतर ऐश्वर्या अभिषेकसोबत अलाहाबादच्या क्लाइव रोड स्थित बंगल्यावर पोहोचली होती. पण यावेळी दोघांनाही बंगल्यात प्रवेश मिळाला नाही. घराबाहेर उभे राहून अभिषेक सतत एका व्यक्तीला फोन लावताना दिसला. पण बंगल्याचे केअर टेकर कृष्ण कुमार पांडेय यांनी बंगल्याचे दार उघडले नाही. अखेर निराश होऊन अभिषेक-ऐश्वर्या तेथून निघून गेले होते.

...म्हणून मिळाला नव्हता अभिषेक-ऐश्वर्याला प्रवेश, 33 वर्षे जुने आहे कारण...
- अलाहाबादच्या या बंगल्याच्या शेजारी राहणारे रवींद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1984 च्या निवडणुकीच्या काळात जेव्हा अमिताभ बच्चन अलाहाबादला आले होते, तेव्हा त्यांनी हा बंगला त्यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले होते.
- त्यामुळे नाराज झालेले बंगल्याचे मालक श्री शंकर तिवारी यांनी हा बंगला अमिताभ बच्चन यांच्या नव्हे तर त्यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट केले होते. या बंगल्यात अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन भाड्याने वास्तव्याला होते. या बंगल्याचे 16 रुपये ते भाडे देत असतं. काही वर्षे भाड्याने राहिल्याने हा बंगला त्यांच्या मालकीचा होत नाही, असे त्यांनी म्हटले होते. 1984 पासून तिवारी यांनी बच्चन कुटुंबातील सदस्यांना या बंगल्यात एन्ट्री बॅन केली होती.
- आता श्री शंकर तिवारी या जगात नाहीत. पण त्यांचे केअर टेकर कृष्ण कुमार पांडेय आजसुद्धा त्यांचा हा नियम पाळतात.

काय आहे ऐश्वर्याचे सासरे अमिताभ आणि अलाहाबाद कनेक्शन ?
- अमिताभ बच्चन यांचे वडील डॉ. हरिवंश राय बच्चन मुळचे अलाहाबादचे होते. ते प्रसिद्ध कवी आणि शिक्षक होते.
- अमिताभ यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबादमध्ये झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ते डेहरादूनला गेले होते.
- बॉलिवूडमध्ये पदार्पण झाल्यानंतर त्यांनी जया भादुरीसोबत 1973साली लग्न केले. 1984 साली अमिताभ अलाहाबादचे खासदार बनले होते. पण 1987 साली त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

पुढील स्लाईड्सवर बघा, अलाहाबाद येथे क्लिक झालेली अभिषेक-ऐश्वर्याची छायाचित्रे...

Next Article

Recommended